Suryakumar Yadav: जिंकलस भावा, सूर्याचा SIX पाहून तुमचा विश्वास नाही बसणार, पहा VIDEO

| Updated on: Nov 28, 2022 | 1:19 PM

सूर्याची अजब बॅटिंग पाहून न्यूझीलंडचा गोलंदाज पाहत राहिला

Suryakumar Yadav: जिंकलस भावा, सूर्याचा SIX पाहून तुमचा विश्वास नाही बसणार, पहा VIDEO
surya
Image Credit source: Screengrab
Follow us on

हॅमिल्टन: सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीमध्ये जादू आहे. त्याची बॅटिंग पाहून फॅन्स हैराण होतात. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने असेच काही अजब-गजब शॉट मारले. ते पाहून फॅन्सच नाही, कॉमेंटेटर सुद्धा हैराण झाले. पावसामुळे काल सामना थांबला होता, त्यावेळी सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 34 धावांवर खेळत होता. सूर्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले होते.

या दरम्यान सूर्याने मायकल ब्रेसवलेच्या चेंडूवर असा सिक्स मारला की, फक्त गोलंदाजच नाही, फॅन्सही पाहत बसले. भारतीय डावाच्या 12 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सूर्याने रिव्हर्स स्विप शॉटवर सिक्स मारला.

सूर्याने लगेच पोजिशन बदलली आणि….

मायकल ब्रेसवेलने ऑफ साइडच्या लाइनवर फुल लेंथ चेंडू टाकला. त्यावर सूर्याने लगेच पोजिशन बदलून रिव्हर्स स्वीप सिक्स मारला. या शॉटने क्रिकेट चाहत्यांच मन जिंकलं. कॉमेंटटर सुद्धा हैराण झाले. सोशल मीडियावर सूर्याच्या या शॉटच भरपूर कौतुक होतय.


पावसामुळे ओव्हर्स कमी झाल्या होत्या

दुसऱ्यांदा पावसामुळे सामना थांबला, त्यावेळी टीम इंडियाच्या 12.5 ओव्हर्समध्ये 1 विकेट गमावून 89 धावा झाल्या होत्या. सामना थांबला, त्यावेळी शुभमन गिल 45 आणि सूर्यकुमार यादव 34 धावांवर खेळत होता. पहिल्यांदा सामना थांबला, त्यावेळी 4.5 ओव्हरमध्ये भारताच्या बिनबाद 22 धावा झाल्या होत्या. चार तास विलंबाने सामना सुरु झाला. त्यावेळी मॅच 29 ओव्हर्सची करण्यात आली. कारण पावसामुळे वेळ वाया गेला होता.