रोहित-ऋषभचा फ्लॉप शो, सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं

| Updated on: Oct 10, 2022 | 2:17 PM

हार्दिक पंड्याने किती धावा केल्या? टीम इंडियाची आज पहिली परीक्षा

रोहित-ऋषभचा फ्लॉप शो, सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धुतलं
सूर्यकुमार यादव
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: T20 वर्ल्ड कप (T20 World cup) जिंकण्यासाठी टीम इंडियाने मागच्या काही महिन्यात रणनिती आखून मेहनत केलीय. अनेक देशांविरुद्ध टीम इंडियाने टी 20 मालिका खेळल्या आहेत. प्रत्येक सीरीजमधून टीम इंडियाच्या काही कमतरता उघड झाल्या आहेत. आताही ऑस्ट्रेलियात (Australia) पहिल्याच सराव सामन्यात टीम इंडियाचे (Team india) कच्चे दुवे समोर आले आहेत. फलंदाजीत पोलखोल झाली आहे.

रोहित शर्मा फ्लॉप

टीम इंडिया आज वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सराव सामना खेळत आहे. पहिल्याच प्रॅक्टिस मॅचमध्ये टीम इंडियाने फक्त 158 धावा केल्या. रोहित शर्मा, ऋषभ पंत सारखे फलंदाज फ्लॉप ठरले. अपवाद फक्त सूर्यकुमार यादवचा. त्याने फलंदाजीत आपली ताकत दाखवून दिली.

सूर्याने सावरला डाव

सूर्यकुमार यादवने प्रॅक्टिस मॅचमध्ये शानदार अर्धशतक झळकावलं. त्याने 52 धावा फटकावल्या. सूर्यकुमार यादवने आधी टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर आपल्या स्टाइलमध्ये वेगवान बॅटिंग केली.

हार्दिकने किती धावा केल्या?

सूर्यकुमार यादवशिवाय हार्दिक पंड्याने 27 आणि दीपक हुड्डाने 22 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा फक्त 3 रन्सवर आऊट झाला. ऋषभ पंतने 17 चेंडूत 8 धावा केल्या. दिनेश कार्तिकने नाबाद 19 धावा केल्या. टीमची धावसंख्या 150 पार पोहोचवली.

सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने 23 सामन्यात 40 पेक्षा जास्त सरासरीने 801 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 6 अर्धशतक आहेत.

कोणाला संधी मिळाली नाही?

प्रॅक्टिस मॅचमध्ये विराट कोहली, केएल राहुल आणि आर. अश्विनला संधी मिळाली नाही. हे खेळाडू नेटमध्ये प्रॅक्टिस करत होते. रोहित आणि पंत ओपनिगला आले होते. हुड्डाला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली.