अहमदाबाद : तरुण आणि स्फोटक फलंदाज शुभमन गिल याची दमदार शतकी खेळी आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माने पाच बळी घेतले. त्यामुळे मुंबई इंडियन्सला नमवून गुजरात टायटन्स फायनलमध्ये पोहोचली आहे. गुजरातने मुंबईचा 62 धावांनी पराभव केला. गिल आणि मोहित शर्माच्या जबरदस्त कामगिरीमुळे गुजरातला हे यश मिळालं. विशेष म्हणजे काल जिंकण्याची संधी मुंबईलाही आली होती. मुंबई जिंकेल असं वाटू लागावं असाही एक क्षण आला होता. कारण सूर्यकुमार यादव सुसाट सुटला होता. त्याने धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली होती. त्यामुळेच मुंबई जिंकणार असं सर्वांना वाटत होतं.
सूर्यकुमार यादव सूर्यासारखा चमकत असतानाच मोहित शर्माने संपूर्ण गेम पाटलटला. मोहितने सूर्याला बोल्ड करून गुजरातला विजयाचे दरवाजे उघडून दिले. हाच मॅचचा खरा टर्निंग पॉइंट ठरला. सूर्याने या सामन्यात 38 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. मोहितने मोठ्या चलाखीने सूर्याचे लेग स्टंप उडवले. त्यावेळी गुजरात विजयाच्या जवळ पोहोचली होती. सूर्याला बाद केल्यानंतर मोहित मैदानावरच स्तब्ध झाला. त्याने डोळे मिटले. हात जोडले आणि काही क्षण मैदानावर तसाच स्थिर झाला. त्याने अनोख्या पद्धतीने विजयाचा जल्लोष केला. मोहितची ही मुद्रा पाहून स्टेडियममधील चाहत्यांनी प्रचंड जल्लोष केला.
गुजरातकडून शुभमन गिलने 129 धावांचा पाऊस पाडला. आयपीएलमधील गिलचे हे तिसरे शतक होते. आयपीएलच्या एका सीजनमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतक ठोकणारा गिल हा तिसरा फलंदाज ठरला आहे. या आधी याच सीजनमध्ये जोस बटलर आणि कोहलीने प्रत्येकी चार शतकं ठोकली आहेत.
The dismissal that turned things back in Gujarat Titans’ favour ?
Mohit Sharma now has three wickets as his side inch closer to victory ????#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI pic.twitter.com/vkEHXqZkV3
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
दरम्यान, आता गुजरातचा लढा चेन्नईशी होणार आहे. येत्या 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गुजरात खेळणार आहे. चेन्नईतच हा अंतिम सामना होणार आहे. विशेष म्हणजे चेन्नईने या आधी क्वालिफायरमध्ये गुजरातला पराभूत करून फायनलमध्ये स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या सीजनचा पहिला सामनाही चेन्नई आणि गुजरात दरम्यानच खेळला गेला होता.
फाइनल में सीएसके साथ मुकाबला