मुंबई: टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज सूर्यकुमार यादवने अल्पावधीत स्वत:ची ओळख निर्माण केलीय. सध्या सूर्यकुमार यादव भन्नाट फॉर्ममध्ये आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तो तुटून पडतो. आतापर्यंत अनेकदा टीम इंडियाला गरज असताना त्याने संकट मोचकाची भूमिका बजावली आहे. टीमला गरज असताना त्याने धावा केल्या आहेत. मागच्याच रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सामन्यात त्याने अशीच कामगिरी केली.
त्याने 36 चेंडूत 69 धावा फटकावल्या. महत्त्वाचं म्हणजे त्याने दबावाखाली ही खेळी केली. त्याच्या या बॅटिंगमुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2-1 ने मालिका विजय मिळवता आला.
मोठी झेप घेतली
सूर्यकुमारला त्याच्या या फलंदाजीचा आयसीसी रँकिंगमध्ये फायदा होतोय. आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये त्याने मोठी झेप घेतली आहे. टीम इंडियाचा हा मिडिल ऑर्डरमधील फलंदाज आयसीसीच्या टी 20 ताज्या रँकिंगमध्ये दुसऱ्या नंबरवर पोहोचलाय.
बाबर आजमला मागे टाकलं
मागच्याच आठवड्यात सूर्यकुमार यादवने बाबर आजमला मागे टाकलं. तो 3 नंबरवर पोहोचला. आता सूर्याने दक्षिण आफ्रिकन फलंदाज एडन मार्करमला मागे टाकून नंबर 2 चं स्थान पटकावलय.
त्याच्याआधी पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान
सूर्यकुमार यादव 801 रेटिंग पॉइंटसह दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. त्याच्याआधी पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान आहे. टीम इंडियासाठी विराट कोहली आणि केएल राहुलने 800 पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट मिळवण्याचा कारनामा केलाय.
सूर्यकुमारच पुढचं लक्ष्य नंबर 1 वर विराजमान होण्याचं असणार आहे. सध्या या जागेवर मोहम्मद रिजवान आहे. रिजवानचे 861 रेटिंग पॉइंटस आहेत. सूर्यकुमार त्याच्यापेक्षा बराच मागे आहे.
अशीच फलंदाजी त्याने सुरु ठेवली, तर लवकरच तो नंबर 1 पर्यंत पोहोचेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या टी 20 रँकिंगमध्येही सुधारणा झालीय. रोहित शर्मा 13 आणि विराट कोहली 15 व्या स्थानावर पोहोचलाय.