दिल्लीच्या हवेत क्रिकेट खेळणं अवघड? Syed Mushtaq Ali Trophy च्या नॉकआउट सामन्यांच्या आयोजनावर सवाल

| Updated on: Nov 13, 2021 | 10:45 AM

य्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या (Syed Mushtaq Ali Trophy) बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सर्व सामने देशाची राजधानी दिल्लीत होणार आहेत.

दिल्लीच्या हवेत क्रिकेट खेळणं अवघड? Syed Mushtaq Ali Trophy च्या नॉकआउट सामन्यांच्या आयोजनावर सवाल
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे (Syed Mushtaq Ali Trophy) नॉकआउट सामने दिल्लीत होणार आहेत.
Follow us on

नवी दिल्ली : सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या (Syed Mushtaq Ali Trophy) बाद फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. सर्व सामने देशाची राजधानी दिल्लीत होणार आहेत. मात्र सध्या दिल्लीतलं हवामान विषारी झालं आहे. त्यामुळेच सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीच्या विषारी हवेत क्रिकेट कसं खेळणार? असे प्रश्न लोक वारंवार विचारत आहेत. दिवाळीत फटाके फोडल्याने दिल्लीची हवा प्रभावित होते. AQI फॉरकास्ट वर्तवणाऱ्या एजन्सीने असा दावा केला आहे की, राजधानी आणि आसपासच्या भागातील परिस्थिती येत्या काही दिवसांत अधिक बिघडू शकते. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Knockout matches Schedule held in Delhi, but weather quality is poor)

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीचे सामने 16 नोव्हेंबरपासून होणार आहेत. तर स्पर्धेतील अंतिम सामना 22 नोव्हेंबरला होणार आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी, नॉकआऊट सामने देखील खेळाडूंसाठी त्यांच्या स्वत: च्या कामगिरीने फ्रेंचायझींची मने जिंकण्याची शेवटची संधी आहे. पण दिल्लीच्या प्रदूषित हवेत क्रिकेट कसे खेळता येईल, हा मोठा प्रश्न आहे. तर खराब हवेमुळे दिल्लीतील लोकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे.

बाद फेरीत एकूण 10 सामने होणार

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या बाद फेरीत 3 प्री-क्वार्टर फायनल (उपउपांत्यपूर्व सामने), 4 क्वार्टर फायनल (उपांत्यपूर्व सामने), 2 सेमीफायनल (उपांत्य सामने) आणि 1 फायनल (अंतिम सामना) असे एकूण 10 सामने खेळवले जातील. बाद फेरीतील पहिला सामना महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात प्री-क्वार्टर फायनलच्या स्वरूपात असेल. दुसरा उपउपांत्यपूर्व सामना हिमाचल प्रदेश आणि केरळ यांच्यात होणार आहे. तर तिसरी प्री-क्वार्टर फायनल कर्नाटक आणि सौराष्ट्र यांच्यात होईल. हे तिन्ही सामने 16 नोव्हेंबरपासून होणार आहेत.

18 नोव्हेंबरपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने

उपांत्यपूर्व फेरी संपल्यानंतर एक दिवसाचा ब्रेक आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबरपासून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी होणार असून, त्यात प्री-क्वार्टर फायनलमधून क्वार्टर फायनल फेरीत पाऊल टाकलेले 3 संघ सहभागी होताना दिसतील, तसेच बंगाल, गुजरात आणि हैदराबाद हे संघ सहभागी होणार आहेत. हे उपांत्य फेरीच्या तिकिटासाठीही लढताना दिसतील. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीची लाइनअप तयार आहे, ज्यामध्ये गुजरात आणि हैदराबादचे संघ 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता भिडतील.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. पहिली उपांत्य फेरी सकाळी 8.30 पासून, तर दुसरी उपांत्य फेरी दुपारी 1 पासून सुरू होईल. यानंतर 21 नोव्हेंबरला विश्रांती असेल. त्यानंतर 22 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.

इतर बातम्या

T20 World Cup Final live streaming: टी20 विश्वचषकाचा महामुकाबला, ऑस्ट्रेलियासमोर न्यूझीलंडचा संघ, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

‘पाकिस्तानचा पराभव माझ्या जावयामुळे,’ शाहीद आफ्रिदीने शाहीनला ठरवलं जबाबदार, म्हणतो यॉर्कर टाकायची अक्कल नाही!

उनाडकटला पुन्हा संधी नाहीच, नाराज जयदेवने VIDEO शेअर करत बीसीसीआयवर साधला निशाणा

(Syed Mushtaq Ali Trophy 2021 : Knockout matches Schedule held in Delhi, but weather quality is poor)