ind vs sa final : गोलंदाज की फलंदाज, बार्बाडोसमधील पिच कोणासाठी लाभदायक?

| Updated on: Jun 29, 2024 | 4:43 PM

IND vs SA Final 2024 : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील सामन्याला काही तास बाकी आहेत. आज ज्या ठिकाणी मॅच होणार आहे, त्या मैदाानावरील पिच कसे आहे आणि गोलंदाज की फलंदाज कोणाच्या फायद्याचं ठरणार आहे. जाणून घ्या.

ind vs sa final : गोलंदाज की फलंदाज, बार्बाडोसमधील पिच कोणासाठी लाभदायक?
Follow us on

T-20 वर्ल्ड कपच्या महाअंतिम सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिलाय. टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका आज एकमेकांना भिडतील. दोन्ही टीम इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर आहेत. टीम इंडियाने इंग्लंडला तर आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत करत फायनल गाठली होती. वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच साऊथ आफ्रिकेचा संघ फायनल खेळणार आहे. यंदाच्या  वर्ल्ड कपमध्ये पाहिलं तर पिचवर सामन्याचा निकाल ठरले. काही मैदानांवर गोलंदाजांना तर काही ठिकाणी फलंगदाजांना मदत मिळाल्याचं पाहायला मिळालं. आज होणाऱ्या फायनल सामन्यावरील पिच कोणाला फायद्याचं असणार जाणून घ्या.

बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये फलंदाज आणि गोलंदाज दोघांना मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना झुकतं माप आहे कारण या पिचवर बॉल बाऊन्ससह स्विंगही होतो. त्यासोबतच मिडल ओव्हरमध्ये स्पिनर्सनाही मदत मिळते. पहिल्या डावात फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या 153 इतकी आहे. त्यामुळे या सामन्यात टॉसची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

बार्बाडोस मैदामावरील टीम इंडिया आणि कॅनडामधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आफ्रिकेने आतापर्यंत सलग 8 सामने जिंकले आहेत, तर भारताने सलग सात सामने जिंकले आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात एकही सामना न गमावता फायनल खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, ओव्हल स्टेडियममध्ये 32 टी-20 सामने झाले आहेत. यामधील प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीमने 19 तर धावांचा पाठलाग करणाऱ्या टीमने 11 सामने जिंकले आहेत. या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक 172 धावा चेस झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघ मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करतील.

रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उप-कप्तान), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सैमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.