अफगाणिस्तानसंदर्भात या दिग्गजाची भविष्यवाणी ठरली सत्य, 2 महिन्यांपूर्वीच म्हटले होते…

| Updated on: Jun 26, 2024 | 7:43 AM

Rashid Khan- Brian Lara, AFG vs BAN T20 World Cup 2024: अफगाणिस्तानचा संघ 2010 पासून टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. तब्बल 14 वर्षांनी हा संघ पहिल्यांदा उपांत्यफेरीत दाखल झाला. एका लांब टप्प्यानंतर अफगाणिस्तानला हे यश मिळाले आहे. आता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत 27 जून रोजी उपांत्यफेरीची लढत होणार आहे.

अफगाणिस्तानसंदर्भात या दिग्गजाची भविष्यवाणी ठरली सत्य, 2 महिन्यांपूर्वीच म्हटले होते...
afghanistan team
Follow us on

Rashid Khan- Brian Lara, AFG vs BAN T20 World Cup 2024: टी 20 विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियासारखा दिग्गज संघ सुपर 8 फेरीतूनच आऊट झाला आणि अफगाणिस्तानसारखा कच्चा निंबू समजला जाणारा संघ उपांत्यफेरीत दाखल झाला. अफगाणिस्तानच्या कामगिरीचे आता सर्वत्र कौतूक केले जात आहे. अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशचा पराभव केला अन् अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याला अक्षरश: रडू कोसळले. अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या डोळ्यांमधून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. परंतु अफगाणिस्तानसंदर्भातील हे भविष्य दोन महिन्यांपूर्वीच वर्तवण्यात आले होते. वेस्ट इंडिजीचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याने अफगाणिस्तान टी20 वर्ल्ड कपच्या उपांत्यफेरीत दाखल होईल, असे मे महिन्यात सांगितले होते. लाराच्या या वक्तव्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. परंतु आता अफगाणिस्तान संघाने लाराचा विश्वास खरा करुन दाखवत इतिहास रचला.

14 वर्षांनी मिळाले यश

अफगाणिस्तानचा संघ 2010 पासून टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. तब्बल 14 वर्षांनी हा संघ पहिल्यांदा उपांत्यफेरीत दाखल झाला. एका लांब टप्प्यानंतर अफगाणिस्तानला हे यश मिळाले आहे. आता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत 27 जून रोजी उपांत्यफेरीची लढत होणार आहे. तसेच भारत आणि इंग्लड यांच्यात लढत होणार आहे. भारताचा सामना रात्री 8 वाजता होणार आहे.

आम्ही लारा यांचा विश्वास सार्थ ठरवला

अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करुन अंतिम चारमध्ये स्थान मिळवत उपांत्यफेरी गाठली. त्यानंतर कर्णधार रशिद म्हणाला की, उपांत्यफेरी गाठण्याचा आमचे स्वप्न सत्य झाले आहे. आम्ही न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर आमचा विश्वास वाढला होता. आम्ही उपांत्यफेरी गाठणार असल्याचे फक्त ब्रायन लारा यांनी म्हटले होते. आम्ही त्यांचे बोलणे सत्य करुन दाखवून दिले.

हे सुद्धा वाचा

ब्रायन लारा काय म्हणाले होते?

ब्रायन लारा याने मे महिन्यात म्हटले होते, ‘वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. चौथ्या स्थानासाठी डार्कहॉर्स अफगाणिस्तानला माझे प्राधान्य आहे. अफगाणिस्तानने यापूर्वी जेवढे विश्वचषक खेळले आहेत ते पाहिल्यावर हा संघ प्रगतीच्या मार्गावर आहे आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवू शकतो.’