श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी20 मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. त्यामुळे श्रीलंकेच्या गोटात चलबिचल दिसत होती. पण दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने कमबॅक करत वेस्ट इंडिजला पाणी पाजलं. यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघासाठी आजचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आपल्या विजयाचा निर्धार केला आहे. आता सामना सुरु झाल्यावर कोणाचं पारडं जड ते कळेल. दरम्यान नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला आणि त्यांनी तात्काळ फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पाठच्या पाच सामन्यात सलग चार सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने स्थिती नाजून होती. पाच पैकी 3 सामने गमावले आहेत. तर एक सामना टाय झाला असून एका सामन्यात विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेल म्हणाला की, “या खेळपट्टीवर 145-150 चा स्कोअर खूपअसू शकतो. आमच्या संघात संघात दोन बदल केले आहेत. स्प्रिंगरच्या जागी ऍलन आणि फ्लेचरच्या जागी संघात होप आला आहे.” श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका याने सांगितलं की, “मी नाणेफेक जिंकली असती तर तेच केले असते. संघात काहीही बदलत नाही. आम्हाला तिन्ही विभागात चांगली कामगिरी करायची आहे. तीच टीम घेऊन मैदानात उतरणार आहोत. मनोबल उंचावले आहे आणि आम्हाला शेवटच्या सामन्याप्रमाणे कामगिरी करायची आहे.”
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, शाई होप (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, गुडाकेश मोटी, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, फॅबियन ऍलन, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा