T20 World cup: मोठी बातमी, Jasprit Bumrah टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाही?

| Updated on: Aug 11, 2022 | 5:06 PM

टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी भारतीय संघाला (Team India) मोठा झटका बसू शकतो. भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.

T20 World cup: मोठी बातमी, Jasprit Bumrah टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार नाही?
jasprit-bumrah
Image Credit source: AP
Follow us on

मुंबई: टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) आधी भारतीय संघाला (Team India) मोठा झटका बसू शकतो. भारतीय संघासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. जसप्रीत बुमराहच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये खेळण्याबद्दल साशंकता आहे. कारण जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) झालेली पाठिची दुखापत गंभीर आहे. जसप्रीत बुमराह भारताचा हुकूमी एक्का आहे. त्याने गरज असताना, संघाला नेहमीच विकेट मिळवून दिल्यात. अशा स्थितीत तो जर टी 20 वर्ल्ड कप संघात नसेल, भारतीय संघाला मोठा फटका बसू शकतो. याच पाठिच्या दुखण्यामुळे त्याचा आशिया कप साठीच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. 2019 मध्येही त्याला याच दुखापतीचा त्रास झाला होता. आता पुन्हा एकदा या दुखण्याने डोकं वर काढलं आहे. बीसीसीआय आणि निवड समिती सदस्यही चिंतेत आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2022 चा संघ जाहीर करायला फक्त महिन्याभराचा कालावधी उरला आहे.

ही त्याची जुनी दुखापत

“निश्चित ही चिंता वाढवणारी बाब आहे. रिहॅबची प्रक्रिया सुरु झालीय. उत्तम वैद्यकीय सल्ला घेतला जाईल. ही त्याची जुनी दुखापत आहे. वर्ल्ड कप साठी फक्त दोन महिने उरलेले असताना, आता त्याला ही दुखापत झालीय. त्याच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. क्रिकेट मधला तो सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याला व्यवस्थित हाताळलं पाहिजे” असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.

दुखापत कशामुळे होते?

पाठिच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराहला बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहाव लागलय. जसप्रती बुमराहची गोलंदाजीची एक वेगळी Action आहे, त्याचा त्याला फटका त्याला बसतो, असं एक्सपर्टच म्हणणं आहे. तो स्वत: या दुखापतीतून सावरलाय व महत्त्वाचे सामने टीम इंडियासाठी खेळलेत. आता पुन्हा एकदा त्याला दुखापत झालीय. आता टी 20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना जसप्रीत बुमराहची ही दुखापत टीम इंडियाला परवडणारी नाही. 2019 मध्ये जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे पाच महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. जसप्रीत बुमराह फिट झाला नाही, तर भारताची मदार भुवनेश्वर कुमारवर असेल.