T20 Cricket World Cup 2021: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) स्पर्धेत बांग्लादेशला अवघ्या 38 चेंडूत नमवत दणदणीत विजय मिळवला आहे. ऑसीसकडून अॅडम झाम्पाने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्यामुळे बांग्लादेशचा संघ केवळ 73 धावाचं करु शकला. जो स्कोर ऑसीसीने 38 चेंडूत 2 विकेट्सच्या बदल्यात पूर्ण करत 8 विकेट्सनी मोठा विजय मिळवला.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरशीची शर्यत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रीकेच्या पुढे पोहोचण्यासाठी एका मोठ्या विजयाची गरज होती. त्यानुसार त्यांनी बांग्लादेशला 8 विकेट्सनी मात देत हे काम केलं आहे. आता ते गुणतालिकेत इंग्लंडच्या खालोखाल आहेत. त्यामुळे त्यांच सेमीफायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे.
A thumping performance from Australia helps them take a massive stride towards the semis ? #AUSvBAN report ? #T20WorldCuphttps://t.co/kJZ9q1EXcV
— ICC (@ICC) November 4, 2021
सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने सर्व संघ करत असल्यालप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशला कमी धावात बाद करुन नंतर टार्गेट पूर्ण करु असा विचार त्यांनी केला. त्याप्रमाणे झाम्पाच्या अप्रतिम गोलंदाजीने त्यांनी बांग्लादेशला 73 धावांत रोखलं. झाम्पाने 5, हेझलवुड आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 2 तर मॅक्सवेलने 1 विकेट मिळवली. त्यानंतर अवघ्या 74 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार आरॉन फिंचने दमदार 40 धावा ठोकल्या. वॉर्नरने 18 धावांची तर मिचेल मार्शने नाबाद 16 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला 6.2 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.
हे ही वाचा
T20 World Cup 2021: येणारा रविवार ठरवणार टीम इंडियाचं भविष्य, भारत सेमीफायनल खेळणार का?
मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती
(T20 World Cup 2021 Australia beat Bangladesh with 8 wickets in hands)