मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची आयसीसी टी-20 विश्वचषकातील मोहिमेची सुरुवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानने त्यांचा 10 गडी राखून दारुण पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन कॉम्बिनेशनबाबत सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले. रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारत आपल्या संघात बदल करू शकेल असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या धर्तीवर भारतीय संघ व्यवस्थापन टी-20 विश्वचषकात रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या ‘करो किंवा मरो’ सामन्यात जुन्याच प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरु शकते. (T20 World Cup 2021 : Hardik pandya to get more chance, Team india play with same playing eleven against new zealand)
विशेष म्हणजे हार्दिक पंड्याला पुढच्या सामन्यात संधी देऊ नये असे सल्ले अनेक माजी क्रिकेटपटून, क्रिकेट समीक्षक देत असताना संघ व्यवस्थापन जुन्या प्लेईंग इलेव्हनवर ठाम आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाला अशी सवय आहे, एक-दोन सामने गमावले तरी सीएसके संघ त्यांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सहसा बदल करत नाही. ज्या प्लेईंग इलेव्हनला पाकिस्तानने दहा विकेट्स राखून पराभूत केले त्याच प्लेईंग इलेव्हनवर भारतीय संघ व्यवस्थापन विसंबून राहू शकतं.
केवळ एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच संघात बदल होईल, अन्यथा तेच खेळाडू अंतिम-11 मध्ये असतील जे पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे टीम कॉम्बिनेशनबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, पण न्यूझीलंडविरुद्धच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये धोनीचे मत महत्त्वाचे ठरणार असल्याचे समजते.
याचाच अर्थ असा की, हार्दिक पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूरला मैदानात उतरवण्याची शक्यता नाही. ठाकूरला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पसंती दिली जात होती आणि त्यामुळे पंड्याच्या जागी त्याच्या नावाची चर्चा होती, पण ठाकूरला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला कोणीही पसंत करणार नाही. असे समजते की भारतीय संघातील सर्व निर्णयकर्त्यांना असे वाटते की ठाकूर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी योग्य नाही. गोलंदाजीचा विचार केला तर ठाकूर विकेट घेणारा गोलंदाज असला तरी तो धावा देणारा आहे. पांड्याने गोलंदाजी सुरू केली आहे कारण त्यालाही माहीत आहे की त्याशिवाय आता चालणार नाही.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पंड्या आयपीएलमध्ये गोलंदाजी करेल असे सांगितले होते, पण तसे झाले नाही. पांड्याने एकही षटक टाकले नाही तर त्याची संघात जागा बनत नाही. अशा स्थितीत ठाकूर खेळू शकला असता, पण सूत्रांवर विश्वास ठेवला तर, भुवनेश्वर कुमारला न्यूझीलंडविरुद्ध खेळवले जाईल आणि त्याचे कारण त्याचे वेगळेपण आहे. संघाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात तो यशस्वी झाला तर कुमार खूप प्रभावी ठरू शकतो. वरुण चक्रवर्ती पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर खेळण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीला फिरकी आक्रमण बदलायचे नसेल तर रविचंद्रन अश्विनला पुन्हा बाहेर बसावे लागेल.
तर बातम्या
T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!
(T20 World Cup 2021 : Hardik pandya to get more chance, Team india play with same playing eleven against new zealand)