मुंबई : ICC T20 विश्वचषक 2021 स्पर्धेमधील भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्या दोन सामन्यांच्या वेळापत्रकावर विराट कोहलीने रविवारी टीका केली. तो म्हणाला की, दोन सामन्यांमधील एका आठवड्यापेक्षा जास्त अंतर ‘हास्यास्पद’ आहे. भारताने स्पर्धेतील आपला पहिला सामना सात दिवसांपूर्वी 24 ऑक्टोबर रोजी आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर आज (31 ऑक्टोबर) भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वपूर्ण सामना खेळत आहे. दुबईत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याच्या नाणेफेकवेळी कोहली म्हणाला, “हे हास्यास्पद आहे, आम्ही 10 दिवसांत दुसऱ्यांदा खेळत आहोत. हा खूप मोठा ब्रेक होता.” विशेष म्हणजे, पाकिस्तानकडून 10 विकेटने पराभूत झाल्यानंतर या स्टार फलंदाजाने सांगितले होते की, “इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर खेळाडू येथे आले आहेत, त्यामुळे हा ब्रेक संघासाठी चांगला असेल.” (T20 World Cup 2021 Virat Kohli criticizes 7 days break between two matched which previously he said helpful)
कोहली म्हणाला होता, “मला वाटते की ही बाब सर्व दृष्टीकोनातून आमच्यासाठी चांगली असेल. आम्ही पूर्ण सीझन खेळलो आहोत हे माहीत असताना आम्ही आयपीएलदेखील खेळलो जी यूएईमधील खडतर परिस्थितीत खूप आव्हानात्मक स्पर्धा होती. त्यानंतर आम्ही वर्ल्ड कपमध्ये आलो. त्यामुळे हे मोठे ब्रेक्स आम्हाला अशा मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या शारीरिक स्थितीत खेळण्यासाठी एक संघ म्हणून नक्कीच मदत करतील.”
रविवारी विराटने आपला विचार बदलला, मात्र दीर्घ विश्रांतीमुळे त्याच्या खेळाडूंना किरकोळ दुखापतीतून सावरण्यास मदत झाली हेदेखील त्याने मान्य केले. कोहली म्हणाला, ‘होय, खेळाडू बरे झाले आहेत. चांगली सराव सत्रे झाली आणि मैदानावर खेळण्यास उत्सुक आहेत ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला भरपूर विश्रांती मिळते तेव्हा तुम्हाला मैदानावर चांगली कामगिरी करायची असते. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा सामना 3 नोव्हेंबरला अफगाणिस्तान, 5 नोव्हेंबरला स्कॉटलंड आणि 8 नोव्हेंबरला नामिबियाशी होणार आहे.
इतर बातम्या
T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे
(T20 World Cup 2021 Virat Kohli criticizes 7 days break between two matched which previously he said helpful)