T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियासाठी एडिलेडमधून एक खराब बातमी

| Updated on: Oct 31, 2022 | 1:44 PM

सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला पुढच्या सामन्यात विजय आवश्यक आहे, पण त्याआधी....

T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियासाठी एडिलेडमधून एक खराब बातमी
Team india
Follow us on

एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडिया आपला पुढचा सामना एडिलेडमध्ये खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू पर्थहून एडिलेडसाठी रवाना झाले आहेत. भारत आणि बांग्लादेशमध्ये 2 नोव्हेंबरला होणारा हा सामना दोन्ही टीम्ससाठी महत्त्वपूर्ण आहे. पण या मॅचआधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक निराश करणारी बातमी आहे. भारतच नाही, कदाचित बांग्लादेशही हा सामना जिंकणार नाही. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?

निकाल लागण्याची शक्यता धुसर

एडिलेडमध्ये 2 नोव्हेंबरला मॅच होणार आहे. त्यादिवशी तिथलं हवामान बिघडू शकतं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या दिवशी ऑस्ट्रेलियन शहर एडिलेडमध्ये पाऊस कोसळण्याची प्रबळ शक्यता आहे. खासकरुन भारत-बांग्लादेश सामना सुरु होण्याच्या समयी पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता धुसर आहे.

एडिलेडमध्ये पाणी-पाणी

भारत-बांग्लादेश सामना 2 नोव्हेंबरला होईल. त्यादिवशी ढगाळ हवामान असेल. 20-30 kmph वेगाने वारे वाहतील. संध्याकाळच्या समयी पाऊस कोसळू शकतो. 2 नोव्हेंबरला एडिलेडमध्ये 60-70 टक्के पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

एडिलेडमधील हवामानाचा भारत-बांग्लादेश सामन्यावर परिणाम होईल. मॅच रद्द झाल्यास, दोन्ही टीम्सना एक-एक पॉइंट मिळेल.

बांग्लादेश विरुद्ध मॅच रद्द होणं, भारतासाठी चांगले संकेत नाहीत. कारण त्यामुळे सेमीफायनलच गणित बिघडू शकतं.

पॉइंटस टेबलमध्ये काय आहे भारत-बांग्लादेशची स्थिती?

पॉइंटस टेबलमध्ये दोन्ही टीम्सची स्थिती समजून घेऊया. दोन्ही टीम्स ग्रुप 2 मध्ये आहेत. भारत चार पॉंइंटससह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. 5 पॉइंटससह दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानावर आहे. बांग्लादेशचेही भारता इतकेच 4 गुण आहेत. ते तिसऱ्या नंबरवर आहेत. भारत आणि बांग्लादेशमध्ये रनरेटचा फरक आहे. म्हणून 2 नोव्हेंबरची एडिलेडमध्ये होणारी मॅच महत्त्वाची आहे. दोन्ही टीम्सना विजय मिळवण आवश्यक आहे.