T20 World cup मधून एक दमदार बॉलर OUT, सूर्या-कार्तिकचा पहिल्याच चेंडूवर संपवला होता खेळ

| Updated on: Oct 09, 2022 | 11:42 AM

T20 वर्ल्ड कप (T20 World cup) 2022 स्पर्धा काही दिवसांवर आली आहे. असं असताना, काही टीम्सना खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे.

T20 World cup मधून एक दमदार बॉलर OUT, सूर्या-कार्तिकचा पहिल्याच चेंडूवर संपवला होता खेळ
craig young
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: T20 वर्ल्ड कप (T20 World cup) 2022 स्पर्धा काही दिवसांवर आली आहे. असं असताना, काही टीम्सना खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे. टीम इंडियाला पेस बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra jadeja) रुपाने आधीच झटका बसला आहे. हे दोन्ही प्लेयर्स वर्ल्ड कप खेळणार नाहीयत. आता आयर्लंडच्या टीमला झटका बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज क्रेग यंग वर्ल्ड कपला मुकणार आहे.

प्रसिद्धी पत्रकात काय माहिती दिलीय?

आयर्लंड क्रिकेटने शनिवारी 8 ऑक्टोबरला एक पत्रक प्रसिद्ध केलं. त्यात क्रेग यंग दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिलीय. सिडनीमध्ये टीमच्या ट्रेनिंग कॅम्प दरम्यान एका जुन्या दुखापतीने डोकं वर काढलय. त्यामुळे तो स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती पत्रकात दिली आहेत.

क्रेग यंगच्या जागी टीममध्ये कोणाचा समावेश?

32 वर्षाचा क्रेग यंग वेगवान गोलंदाज आहे. आयर्लंड क्रिकेटमधील तो अनुभवी खेळाडू आहे. त्याने टीमसाठी 53 टी 20 मॅचमध्ये 55 विकेट घेतल्यात. भारताविरुद्ध जूनमध्ये सीरीज झाली. त्यावेळी त्याने 2 मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या.

यंग भारताविरुद्ध दोन सामने खेळला. यात त्याने सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल यांना पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यंगच्या जागी 31 वर्षीय ग्राहम ह्यूमचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. त्याने दोन महिन्यापूर्वी डेब्यु केला होता. आयर्लंडची टीम आपला पहिला सामना 17 ऑक्टोबरला झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे.

आयर्लंडचा स्क्वॉडः एंड्रू बल्बर्नी (कॅप्टन), पॉल स्टर्लिंग, मार्क एडेयर, कर्टिस कॅम्फर, गैरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फियॉन हँड, ग्राहम ह्यूम, जॉश लिटिल, बॅरी मॅक्कार्थी, कॉनर ओल्फर्ट, सिमी सिंह, हॅरी टॅक्टर, लॉरकन टकर,