मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी सर्वच टीम्सनी जोरदार तयारी सुरु केलीय. काही टीम्सनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. काही टीम्सनी आपला कोचिंग स्टाफ अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. इंग्लंड क्रिकेट टीमनेही असाच निर्णय घेतलाय. त्यासाठी ऑस्ट्रेलियन दिग्गजांची मदत घेतली आहे.
कोचिंग स्टाफमध्ये समावेश
मॅथ्यू मॉट इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 टीमचे कोच आहेत. त्यांनी वर्ल्ड कप तयारीसाठी कोचिंग स्टाफमध्ये मायकल हसी आणि डेविड सेकर यांचा समावेश केला आहे. हसी ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज आहेत. डेविड सेकर माजी वेगवान गोलंदाज आहे. सल्लागार म्हणून त्यांचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला आहे.
हसी फक्त टी 20 वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लिश टीमला मार्गदर्शन करतील. इंग्लंडचा संघ या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यापासूनच सेकर इंग्लिश टीमच्या गोलंदाजांना कोचिंग सुरु करतील.
इंग्लंडआधी पीसीबीने सुद्धा तेच केलय
इंग्लंडच्या आधी पाकिस्तानने सुद्धा ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश केला होता. पीसीबीने मॅथ्यू हेडनचा फलंदाज सल्लागार म्हणून समावेश केलाय. मागच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा हेडन पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफचा भाग होते. मॅथ्य हेडन दिग्गज ऑस्ट्रेलियन सलामीवीर होते.
वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा स्क्वाड: जोस बटलर (कॅप्टन), एलेक्स हेल्स, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली, क्रिस वोक्स आणि मार्क वूड