एडिलेड: T20 वर्ल्ड कपच्या एका महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला 4 धावांनी हरवलं. ऑस्ट्रेलियाची टीम पहिली बॅटिंग करण्यासाठी उतरली होती. त्यांनी 8 विकेट गमावून 168 धावा केल्या. या विजयानंतरही ऑस्ट्रेलियाची सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची गॅरेंटी नाहीय. ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये जाणार की, नाही? ते इंग्लंड आणि श्रीलंकेमधील सामन्याच्या निकालावर ठरेल.
समजून घ्या पॉइंट्सच गणित
श्रीलंका आणि इंग्लंडमध्ये 5 नोव्हेंबरला मॅच होणार आहे. श्रीलंकेने शेवटच्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला, तर ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. इंग्लंड वर्ल्ड कपमधून बाहेर होईल. कारण ऑस्ट्रेलियाचे 7 पॉइंटस झाले आहेत. श्रीलंकेची टीम आधीच बाहेर गेली आहे. इंग्लंड विरुद्ध विजय मिळवूनही त्यांचे 6 पॉइंटस होतील. इंग्लंड-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला, तरी ऑस्ट्रेलियाची टीम फायनलमध्ये पोहोचेल.
टीम | सामने | विजय | पराजय | रनरेट | पॉइंटस |
---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | 5 | 3 | 1 | +2.113 | 7 |
ऑस्ट्रेलिया | 5 | 3 | 1 | -0.173 | 7 |
इंग्लंड | 4 | 2 | 1 | +0.547 | 5 |
श्रीलंका | 4 | 2 | 2 | -0.457 | 4 |
आयर्लंड | 5 | 1 | 3 | -1.615 | 3 |
अफगाणिस्तान | 5 | 0 | 3 | -0.571 | 2 |
ऑस्ट्रेलिया जिंकूनही इंग्लंडला फायदा
आज ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तावर विजय मिळवला. पण त्याचा फायदा इंग्लंडला झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा कुठलाही दबाव इंग्लंडच्या टीमवर नसेल. इंग्लंडला आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त श्रीलंकेवर विजय मिळवण्याची गरज आहे. श्रीलंकेवर विजय मिळवल्यास इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे बरोबर 7 पॉइंटस होतील. त्यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील नेट रनरेट पाहिला जाईल. यात इंग्लंडची टीम पुढे आहे. न्यूझीलंडची टीम आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.