एडिलेड: भारत आणि इंग्लंडमध्ये गुरुवारी एडिलेड येथे टी 20 वर्ल्ड कप 2022 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाखील भारतीय टीम ग्रुप 2 मध्ये टॉपर आहे. इंग्लिश टीम ग्रुप 1 मध्ये दुसऱ्या स्थानावर होती. टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या मॅचआधी इंग्लिश टीमला धक्का बसला आहे. इंग्लंड टीमचा T20 मधील मोठा फलंदाज डेविड मलान टीममधून बाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
त्याच्या कमरेला दुखापत
आयसीसी टी 20 रँकिंगमधील टॉप 10 बॅट्समनसमध्ये डेविड मलानचा समावेश होतो. मलानला दुखापत झालीय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली. त्याच्या कमरेला दुखापत झालीय. त्यामुळे तो भारताविरुद्ध खेळेल का? याबद्दल साशंकता आहे.
दुखापतीमधून लवकर सावरण्याची शक्यता कमी
सेमीफायनलला अजून काही दिवस बाकी आहेत. मलान त्याच्या दुखापतीमधून वेळीच सावरेल, असं दिसत नाहीय. मैदानाबाहेर येताना त्याला त्रास होत होता, असं आदिल रशीदने सांगितलं. मलान लवकर बरा होईल, अशी अपेक्षा आहे.
शानदार फॉर्ममध्ये आहे मलान
डेविड मलान या वर्ल्ड कपमध्येही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याला फलंदाजीची जास्त संधी मिळाली नाही. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 18 धावा निघाल्या होत्या. आयर्लंड विरुद्ध त्याने 35 रन्स केल्या. न्यूझीलंड विरुद्ध मलान 3 धावांवर नाबाद राहिला. मलान क्रिकेट विश्वातील 6 वा सर्वश्रेष्ठ टी 20 बॅट्समन आहे.
GET IN! ?
Semi-finals here we come! ?
Scorecard: https://t.co/54McmntVSg#T20WorldCup pic.twitter.com/nT74QlH4CJ
— England Cricket (@englandcricket) November 5, 2022
भारताविरुद्ध चांगली फलंदाजी
भारताविरुद्ध डेविड मलान नेहमीच जबरदस्त खेळला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये टी 20 सीरीज झाली. त्यावेळी त्याने चांगल्या धावा केल्या. नॉटिंघम येथे डेविड मलानने भारताविरुद्ध सर्वाधिक 77 धावा फटकावल्या होत्या. मागच्यावर्षी अहमदाबादमध्ये त्याने 68 धावा केल्या होत्या.