ब्रिस्बेन: टीम इंडिया आज न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) दुसरा सराव सामना खेळणार होती. पण हा सामना रद्द झाला आहे. ब्रिस्बेनमध्ये ही मॅच होणार होती. पावसामुळे हा सामना रद्द झाला आहे. दोन्ही टीम्स सुपर 12 मध्ये आधीच पोहोचल्या आहेत. टीम इंडिया याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळली. या मॅचमध्ये टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला होता.
त्यामुळे आयोजकांनी सामना रद्द केला
बुधवारी ब्रिस्बेनमध्ये पाऊस कोसळत होता. भारत आणि न्यूझीलंडची टीम मॅचसाठी गाबा स्टेडिमयमध्ये दाखल झाली होती. आज पाऊस थांबलाच नाही. त्यामुळे आयोजकांना अखेर सामना रद्द करावा लागला.
कट ऑफ टाइम किती होता?
मॅचचा कट ऑफ टाइम संध्याकाळी 4.16 मिनिट होता. पाऊस थांबला असता, तर या वेळेपर्यंत वाट पाहता आली असती. पण सतत पाऊस कोसळत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानचा सामनाही रद्द
या सामन्याआधी गाबामध्येच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सराव सामना होणार होता. पण पावसामुळे हा सामना सुद्धा रद्द झाला. ब्रिस्बेनच्या एलन बॉर्डर मैदानात बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारा सराव सामना पावसामुळे रद्द झाला.
आज शेवटची संधी होती
आता टीम इंडियाचा पुढचा सामना थेट पाकिस्तान विरुद्ध होईल. टी 20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची ही पहिली मॅच असेल. मेलबर्नमध्ये 23 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. पहिल्या सराव सामन्यात लास्ट ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने कमाल केली होती. आज टीम इंडियाकडे तयारीचा आढावा घेण्याची शेवटची संधी होती.