सिडनी: पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2022 चा सेमीफायनल सामना सुरु आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण शादाब खानच्या एका थ्रो ने न्यूझीलंडचा हा निर्णय चुकीचा ठरवला. शादाब खानच्या थ्रो मुळे डेवॉन कॉनवे सारख्या टॉप प्लेयरला पॅव्हेलियनमध्ये परताव लागलं. डेवॉन कॉनवे एका जबरदस्त थ्रो वर रनआऊट झाला.
मोठी धावसंख्या न होण्यामागे हे कारण
शादाबच्या थ्रो ने नॉन-स्ट्राइकर एन्डवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे कॉनवे रनआऊट झाला. न्यूझीलंडला आज पाकिस्तान विरुद्ध मोठी धावसंख्या उभारता आली नाही. याच कारण डेवॉन कॉनवे सुद्धा आहे. तो 20 चेंडूत 21 रन्सवर रनआऊट झाला.
त्याने लगेच चेंडू उचलून थ्रो केला
न्यझीलंडच्या पावरप्लेमध्ये शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर विकेट काढली. हॅरिस रौफ त्यावेळी गोलंदाजी करत होता. डेवॉन कॉनवेने मिडऑफला शॉट मारला. तो धाव घेण्यासाठी पळाला. शादाब खान तिथे उभा होता. त्याने लगेच चेंडू उचलून अचूक थ्रो केला. त्यामुळे कॉनवे बाद झाला.
मिड ऑफला शॉट मारुन डेवॉन कॉनवे जितक्या वेगाने रन्स घेण्यासाठी पळाला, शादाब खानही तितक्याच वेगाने चेंडूवर झेपावला. नॉन स्ट्राइक एन्डला अचूक थ्रो करुन कॉनवेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
पाकिस्तानला किती धावांचे लक्ष्य
डॅरेल मिचेलने फटकेबाजी केली. त्याने हाफ सेंच्युरी झळकवली. त्याच्या बॅटिंगमुळे न्यूझीलंडला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मिचेलने 35 चेंडूत नाबाद 53 धावा फटकावल्या. न्यूझीलंडने न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 152 धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य दिले आहे.