T20 World Cup: युजवेंद्र चहलने शेयर केलेल्या व्हिडिओवर बायको धनश्रीचा डान्स, पहा VIDEO

| Updated on: Oct 20, 2022 | 5:40 PM

T20 World Cup: हा VIDEO मोठ्या प्रमाणात शेयर होतोय, त्यावर कमेंट, लाइक्सचा पाऊस.

T20 World Cup: युजवेंद्र चहलने शेयर केलेल्या व्हिडिओवर बायको धनश्रीचा डान्स, पहा VIDEO
Dhanshree verma
Image Credit source: instagram
Follow us on

मेलबर्न: भारतीय टीमचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कपची (Australia T20 World Cup) तयारी करतेय. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. मेलबर्नमध्ये ही मॅच होईल. या मॅचआधी युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर वर्ल्ड कप साँग शेयर केलय. या व्हिडिओमध्ये चहल वर्ल्ड कपची तयारी करताना दिसतोय. मैदानात चहल मेहतन करताना दिसतो. हा खूपच सिंपल व्हिडिओ आहे.

बल्ला चला, छक्का लगा…

‘बल्ला चला, छक्का लगा… ये कप हमारा है घर लेकर आ…’ हे चहलने सोशल मीडियावर शेयर केलेल्या व्हिडिओमधील गाण्याचे शब्द आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेयर होत असून त्याला लाइक्स मिळत आहेत. फॅन्सनी कमेंटस करताना वर्ल्ड कप विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


टीम इंडियाची ब्लू जर्सी

चहलची बायको धनश्रीने सुद्धा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केलाय. फक्त धनश्रीने हा व्हिडिओ शेयर करताना त्याता थोडा बदल केलाय. बँकग्राऊंडमध्ये वर्ल्ड कप साँग ऐकू येतय. पण धनश्री स्वत: या गाण्यामध्ये डान्स करताना दिसते. धनश्रीने टीम इंडियाची ब्लू जर्सी सुद्धा परिधान केलीय.

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय स्क्वॉड: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.