एडिलेड: T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सध्या सूर्यकुमार यादवची तुफान बॅटिंग सुरु आहे. त्याने 5 मॅचमध्ये 3 हाफ सेंच्युरी झळकवल्यात. सूर्यकुमारच्या शॉट्सची चर्चा आहे. खासकरुन झिम्बाब्वे विरुद्ध लास्ट बॉलवर मारलेला स्कूप. हा शॉट पाहून पाहणारे दंग झाले. मॅचनंतर अश्विनसोबत चर्चा करताना सूर्यकुमार यादवने हा आडवा-तिडवा फटका मारण्याच्या कारणाचा खुलासा केला.
बीसीसीआयने अश्विन आणि सूर्यकुमार यादवच्या चर्चेचा व्हिडिओ शेयर केलाय. अश्विनने सूर्यकुमारला तुला मिस्टर 360 का बोलतात? हा प्रश्न विचारला.
कसं जमतं तुला?
स्लोअरवन विकेटकीपरच्या डोक्यावरुन मारतोस, थर्ड मॅनला चौकार मारतोस, कसं जमतं तुला? कसं मॅनेज करतो? तू या शॉट्सचा अभ्यास केला आहेस का? त्यावर सूर्या म्हणाला की, “बाऊंड्री खूप लांब होती. पण मागची बाऊंड्री जवळ होती. म्हणून तिथे फटके खेळले”
सूर्या कुठे शिकला हा फटका?
सूर्याने त्याच्या शॉट्स मागची गोष्ट सांगितली. जी त्याच्या लहानपणाशी संबंधित आहेत. लहानपणी मी रबर बॉलने क्रिकेट खेळायचो. त्याचवेळी या शॉटवर हुकूमत बसवली. झिम्बाब्वे विरुद्ध सूर्याने 25 चेंडूत 61 धावांची तुफान बॅटिंग केली. त्याने 4 चौकार आणि 6 षटकार लगावले. गोलंदाजाच्या डोक्यात काय चाललय? हे तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. माझा स्वत:वर विश्वास आहे, असं सूर्यकुमारने सांगितलं.