एडिलेड: टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये बुधवारी एडिलेड ओव्हलच्या मैदानात सुपर 12 राऊंडचा सामना झाला. या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाने ही मॅच फक्त 5 धावांनी जिंकली. टीम इंडियासाठी हा विजय आवश्यक होता. कारण त्यामुळे त्यांचा पुढचा सेमीफायनलचा प्रवास सोपा झालाय. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. पण बांग्लादेशच्या एका प्लेयरने सर्वांच मन जिंकलं.
त्या खेळाडूच नाव आहे….
त्याच्या बॅटिंगमुळे मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. भारत-बांग्लादेश सामना त्याच्यामुळे रोमहर्षक बनला. त्या खेळाडूच नाव आहे लिट्टन दास. या प्लेयरने सुरुवातीपासून टीम इंडियाच्या गोलंदाजांवर प्रहार केला. 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लिट्टन दासने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
विराट कोहलीच मन जिंकलं
त्याच्या बॅटिंगमुळे सातव्या ओव्हरच्या अखेरीस बांग्लादेशची टीम डकवर्थ लुइसमध्ये पुढे होती. त्याच्या याच खेळाने टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीच मन जिंकलं. सामना संपल्यानंतर लिट्टनच्या खेळाच कौतुक म्हणून विराटने त्याला बॅट गिफ्ट केली.
केएल राहुलच्या थ्रो वर रनआऊट होण्यापूर्वी लिट्टन दासने 27 चेंडूत 60 धावा फटकावल्या. सामन्यानंतर विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. पण विराटने लिट्टनला गिफ्टमध्ये बॅट देऊन त्याचा सन्मान केला.
कुठे दिलं गिफ्ट?
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. “आम्ही डायनिंग हॉलमध्ये बसलो होतो. विराटने तिथे येऊन लिट्टनला बॅट गिफ्ट केली. माझ्यामते लिट्टनसाठी तो प्रेरणादायी क्षण होता” असं जलाल युनूस यांच्या हवाल्याने बांग्लादेशी माध्यमाने म्हटलं आहे.