WI vs IRE: पराभवानंतर निकोलस पूरन कोसळला, डोळे भरुन आले, एवढच म्हणाला ‘माफ करा आम्हाला’

| Updated on: Oct 21, 2022 | 6:16 PM

WI vs IRE: सामन्यानंतर त्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत.

WI vs IRE: पराभवानंतर निकोलस पूरन कोसळला, डोळे भरुन आले, एवढच म्हणाला माफ करा आम्हाला
nicholas pooran
Follow us on

मेलबर्न: वेस्ट इंडिजची टीम टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) मधून बाहेर गेली आहे. सुपर 12 मध्ये स्थान बनवण्यात ते अपयशी ठरले. शुक्रवारी निकोलस पूरनच्या वेस्ट इंडिजचा आयर्लंड (WI vs IRE) विरुद्ध सामना झाला. हा सामना त्यांच्यासाठी करो या मरो होता. दोनवेळा टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवणारी वेस्ट इंडिजची टीम (West Indies Team) या सामन्यात अपयशी ठरली.

अश्रू रोखता आले नाहीत

या पराभवानंतर वेस्ट इंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनच मन मोडलं. सामन्यानंतर त्याला आपले अश्रू रोखता आले नाहीत. आम्ही आमच्या प्रदर्शनाने फॅन्सना निराश केलं, असं पूरनने सांगितलं.

त्याचे शब्द जड झाले होते

पराभवानंतर पूरन खूपच भावूक झाला होता. टीममधील अन्य खेळाडू त्याची समजूत काढत होते. मॅचनंतर प्रजेटेशनच्यावेळी बोलावलं, त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचे शब्द जड झाले होते. “ही कठीण वेळ आहे. आम्ही संपूर्ण स्पर्धाकाळात चांगली फलंदाजी केली नाही. एका चांगल्या पीचवर आम्ही 145 धावाच केल्या, तर आमच्या गोलंदाजांसाठी मॅच वाचवणं कठीण आहे. सुरुवातीपासूनच आमच्यासाठी हे आव्हान होतं” असं पूरन म्हणाला.

भावूक झालेल्या पूरनकडून टीमच कौतुक

पूरनने आपल्या स्टार खेळाड़ूंच कौतुक केलं. “आयर्लंडने शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आमच्यासाठी काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडल्या. जेसन होल्डरने पुन्हा गोलंदाजी सुरु केलीय. किंगने चांगली फलंदाजी केली” असं पूरन म्हणाला.

“जोसेफही आमच्यासाठी गोलंदाजी करतोय. आम्ही निराश आहोत. पण आमच्यासाठी हा एक धडा आहे. आम्ही आमच्या फॅन्सना निराश केलय. आम्हाला याच दु:ख आहे. मी आपल्या प्रदर्शनाने सहकाऱ्यांना निराश केलय” असं पूरनने सांगितलं. पूरनने तीन सामन्यात केवळ 25 धावा केल्या. त्याने स्कॉटलंड विरुद्ध 5, झिम्बाब्वे विरुद्ध 7 आणि आयर्लंड विरुद्ध 13 धावा केल्या.