PAKW vs ENGW : महिला T20 वर्ल्ड कपमध्ये काल पाकिस्तानचा प्रवास संपुष्टात आला. इंग्लंडने पाकिस्तानचा मोठा पराभव केला. इंग्लंडने पाकिस्तानवर 114 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये धावांच्या हिशोबाने हा मोठा विजय आहे. या टुर्नामेंट पाकिस्तानचा खराब खेळ हा चर्चेचा विषय आहेच. पण काल पाकिस्तानच्या एका प्लेयरने मैदानात अशी चूक केली की, ते क्रिकेट विश्वात ते चेष्टेचा विषय बनलेत. पाकिस्तानी खेळाडू तुबा हसन इंग्लंड विरुद्ध बालिश पद्धतीने रनआऊट झाली. त्यानंतर तिच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय.
खांदे पा़डणं कितपत योग्य
घटना 19 व्या ओव्हरमधील आहे. तुबा हसनने डेवीसच्या चेंडूवर लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका मारला. चेंडू बाऊंड्री पार जाईल असं वाटलं. पण इंग्लिश फिल्डरने डाइव्ह मारुन चेंडू अडवला. त्यानंतर एलीस कॅप्सीने चेंडू थ्रो केला व तुबा हसन रनआऊट झाली. थ्रो नॉन स्ट्राइक एंडवर आला, त्यावेळी तुबा हसन क्रीजच्या दिशेने आरामात येत होती. तुबा हसनने आपला विकेट जाणुनबुजून दिलाय असं वाटलं. पाकिस्तानसाठी विजय अशक्य वाटत होता. पण एका आंतरराष्ट्रीय सामन्यात एखाद्या खेळाडूने अशा प्रकारे खांदे पा़डणं कितपत योग्य आहे. तिच्याकडे पाहून जणू ती जिंकण्याची जिद्द हरलीय असं वाटत होतं.
पाकिस्तानचा मोठा पराभव
मॅचमध्ये पाकिस्तानची टीम कुठल्याही आघाडीवर इंग्लंडसमोर आव्हान निर्माण करु शकली नाही. पाकिस्तानच्या टीमला वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंडने पराभूत केलं. इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध 20 ओव्हर्समध्ये 213 धावा केल्या. नेट सिवरने 40 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. डॅनी व्याटने 33 चेंडूत 59 धावा फटकावल्या. पाकिस्तानी टीमने प्रत्युत्तरात 20 ओव्हर्समध्ये फक्त 99 धावा केल्या.
सेमीफायनलचा लाइन अप निश्चित
पाकिस्तानची टीम बाहेर झाल्यानंतर आता सेमीफायनलचा लाइन-अप निश्चित झालाय. सेमीफायनलमध्ये गुरुवारी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना होणार आहे. दुसरा सेमीफायनल सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या टीममध्ये होईल. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि न्यूझीलंडची टीम आता मायदेशी परतणार आहे.