IND vs SA Final : कर्णधार रोहित शर्माने अखेर विराट कोहलीबाबत घेतला मोठा निर्णय, “अंतिम सामन्यात…”

| Updated on: Jun 28, 2024 | 2:35 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने अखेर इंग्लंडकडून लगान वसूल केला आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं. त्याच्या वेदना होत होत्या. अखेर भारताने उपांत्य फेरीतच पराभूत करून वचपा काढला आहे. असं असताना दुसरीकडे, विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला. त्यावर कर्णधार रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं आहे.

IND vs SA Final : कर्णधार रोहित शर्माने अखेर विराट कोहलीबाबत घेतला मोठा निर्णय, अंतिम सामन्यात...
Image Credit source: BCCI
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरु आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता जेतेपदापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीला सूर गवसलेला नाही. त्याचा अनुभव पाहता त्याच्यावर वारंवार विश्वास टाकला जात आहे. मात्र त्या कसोटीवर सिद्ध करण्यात अयशस्वी ठरला आहे. आतपर्यंत खेळलेल्या सात सामन्यात विराट कोहलीने एकूण 75 धावा केल्या आहेत. दुसरा कोणता फलंदाज असता तर त्याला रोहित शर्माने कधीच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवलं असतं. पण विराटचं महत्त्व त्याला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचं असणं संघासाठी किती फायदेशीर ठरेल याचा अंदाज आहे. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने याबाबत आपलं मत व्यक्त केलं. तसेच विराट कोहलीची पाठराखण केली असून तो अंतिम सामन्यातही असेल याबाबत सांगितलं आहे.

“विराट कोहली एक क्लास प्लेयर आहे. कोणताही खेळाडूला या प्रसंगातून जावं लागतं. पण त्याचा खेळ आणि त्याचे महत्त्व आम्हाला माहिती आहे. फॉर्म ही समस्या ठरू शकत नाही. त्याचा हेतू स्पष्ट आहे. त्यामुळे आम्ही फायनलमध्येही त्याच्या पाठीशी आहोत.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. म्हणजेच विराट कोहली अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल यात शंका नाही.

विराट कोहलीने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात 1, पाकिस्तानविरुद्ध 4, अमेरिकेविरुद्ध 0, अफगाणिस्तानविरुद्ध 24, बांगलादेशविरुद्ध 37, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 0 आणि इंग्लंडविरुद्ध 9 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता चाहत्यांना आहे. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या विराटची बॅट मात्र वर्ल्डकपमध्ये शांत आहे. आता अंतिम फेरीत विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.