IND vs SA Final : नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितली ‘मन की बात’, स्पष्ट केलं की..

| Updated on: Jun 29, 2024 | 7:51 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात विजय मिळवताच जेतेपदाचा मान मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपलं सर्वकाही पणाला लावणार यात काही शंका नाही. नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटा विकेट असल्याने 180 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते.

IND vs SA Final : नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने सांगितली मन की बात, स्पष्ट केलं की..
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला. आतापर्यंत वर्ल्डकपच्या मागच्या पर्वांचा विचार केला तर नाणेफेक जिंकलेला संघ जेतेपद जिंकला आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या मनासारखं अंतिम सामन्यात झालं. “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली आहे. आम्ही येथे एक गेम खेळला आहे, स्कोअर खरोखर चांगले आहेत. फक्त वैयक्तिक भूमिका समजून घेतली पाहीजे. मला माहित आहे की हा एक मोठा सामना आहे परंतु शांत राहणं गरजेचं आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत चांगली खेळली आहे. दोन दर्जेदार संघांमध्ये हा खरोखरच चांगला खेळ होणार आहे.”

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम सांगितलं की, “प्रथम फलंदाजीही केली असती. विकेट कोरडी दिसतंयच. पण आम्हाला गोलंदाजी करताना पहिल्यांदा क्रॅक मिळेल त्यामुळे आम्ही चांगली कामगिरी करू शकतो. काही वेळा आम्ही आमच्या सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही पण तरीही आम्ही जिंकण्यात यशस्वी झालो आहोत आणि त्यातून आम्ही आत्मविश्वास बाळगतो. आमच्यावर कोणतेही दडपण नाही, आम्ही कधीही फायनलमध्ये गेलो नाही आणि आम्हाला फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करायचे आहे.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.