IND vs SA Final : दहा षटकं खेळत विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, स्ट्राईक रेटने चाहते नाराज

| Updated on: Jun 29, 2024 | 9:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीची टीम इंडियाला साथ लाभली. एकीकडे दिग्गज फलंदाज झटपट बाद होत असताना विराट कोहीलीन 76 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश आलं. असं असलं तरी क्रीडाप्रेमी त्याच्या खेळीने नाराज आहेत.

IND vs SA Final : दहा षटकं खेळत विराट कोहलीची अर्धशतकी खेळी, स्ट्राईक रेटने चाहते नाराज
Image Credit source: BCCI
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने अपेक्षित कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली फॉर्मासाठी झुंजताना दिसला. मात्र अंतिम फेरीत त्याने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध विराट कोहली एकटाच 10 षटकं खेळला. तर इतर फलंदाजांच्या वाटेला फक्त 10 षटकं आली. विराट कोहलीची खेळी महत्त्वाची असली तरी जितक्या वेगाने या धावा व्हायला हव्या होत्या तितक्या वेगाने झाल्या नाहीत. विराट कोहलीने त्याच्या खेळीत 6 चौकार आणि दोन षटकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 128.81 इतका होता. दुसरीकडे, टीम इंडियाकडे फलंदाजीसाठी मोठी फळी असतानाही विराट रिस्क घेताना चाचपडताना दिसला. त्यामुळे चाहते अस्वस्थ झाले होते. असं असलं तरी विराट कोहलीची खेळी बऱ्याच अंशी महत्त्वाची आहे. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 180 धावांपर्यंत मजल मारता आली. आता त्याची ही खेळी विजयासाठी पूरक ठरते की मारक हे काही वेळात स्पष्ट होईल.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं. यावेळी रोहित शर्माने 5 चेंडूत 9, विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावा केल्या. ऋषभ पंतला आपलं खातंही खोलता आलं नाही. सूर्यकुमार यादव 3 धावा करू बाद झाला. अक्षर पटेल या सामन्यात निर्णायक खेळी केली. 31 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 47 धावा केल्या. शिवम दुबेन 27, तर रविंद्र जडेजा 2 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने 2 चेंडूंचा सामना करत 5 धावा केल्या.

दक्षिण अफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिक नॉर्त्जे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर मार्को जानसेन आणि कगिसो रबाडा यांना प्रत्येक 1 गडी बाद करण्यात यश आलं. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांवर विजयाचं गणित आहे. दक्षिण अफ्रिकेला रोखणार की नाही आता काही वेळातच स्पष्ट होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह