IND vs SA Final : सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने केलं असं काही, स्ट्राईक मिळताच..

| Updated on: Jun 29, 2024 | 8:28 PM

वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारतावर दडपण वाढलं आहे. महत्त्वाचे तीन गडी बाद झाल्याने क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. त्यामुळे 180 धावांपर्यंत मजल मारणं खूपच कठीण होताना दिसत आहे.

IND vs SA Final : सामना सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने केलं असं काही, स्ट्राईक मिळताच..
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अपेक्षेप्रमाणे फटकेबाजी केली. पण दुसऱ्या षटकात रोहित शर्माची विकेट गेली आणि टीम इंडियावर दबाव वाढला.या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. कारण मागच्या सात सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून हव्या तशा धावा आल्या नव्हत्या. दोनदा तर शून्यावर बाद होण्याची वेळ आली. त्यामुळे विराट कोहलीच्या चेहऱ्याचं दडपण स्पष्टपणे दिसत होतं. रोहित शर्माने स्ट्राईक घेतल्यानंतर नॉन स्ट्राईक एन्डला विराट कोहली बॅट पकडून खाली बसला.थोडा वेळ त्याच स्थितीत बसल्यानंतर जोरात श्वास सोडला आणि सज्ज झाला. रोहित शर्मा मार्को जानसेनच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत विराटला स्ट्राईक दिली.

विराट कोहलीने जानसेनच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत आपला हेतू स्पष्ट केला. त्यानंतर दुसऱ्या चेडूवर पुन्हा एक जबरदस्त चौकार मारत आपण मोठ्या सामन्यातील खेळाडू असल्याचं दाखवून दिल. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत एकेरी धावांचं वलय तोडून टाकलं. दुसऱ्या षटकात रोहित शर्माने देखील चांगली सुरुवात केली होती. मात्र फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला ऋषभ पंत काही खास करू शकला नाही. त्याचा बिंधास्त अंदाज काहीच कामाचा ठरला नाही. सूर्यकुमार यादवही काही खास करू शकला नाही. त्यामुळे सर्वच जबाबदारी विराट कोहलीवर येऊ ठेपली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह