आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाद झाला. ए ग्रुपमधील अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे आयर्लंड आणि अमेरिका या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला आहे. अमेरिकेने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला तर पाकिस्तान संघ बाहेर झाला. यामुळे भारताचा उपांत्यफेरीचा मार्ग सोपा झाला आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अशा दोन संघासोबत होऊ शकते, ज्याच्या विरुद्ध भारत कधीच पराभूत झाला नाही. भारतीय संघाचा उपांत्यफेरीत सामना अफगाणिस्तान, बांगलादेश किंवा ऑस्ट्रेलियाशी होऊ शकतो. त्यापैकी अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघाविरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच पराभूत झाला नाही.
ऑस्ट्रेलियाचा संघ सुपर 8 मध्ये पोहचला आहे. अफगाणिस्तान संघ 8 साठी पात्र ठरला आहे. हे दोन संघ सुपर 8 मध्ये निश्चित झाले आहेत. तिसरी टीम बांगलादेश किंवा नेंदरलँड यापैकी एक असणार आहे. यामुळे 20 जून अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा सामना होईल. 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध लढत तर 24 जून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. यापैकी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत बांगलादेश किंवा अफगाणिस्तानविरुद्ध मजबूत आहे. टीम इंडिया दोन्ही संघाविरुद्ध कधीच पराभूत झाली नाही. तसेच बांगलादेशऐवजी नेदरलँडचा संघ आला तरी समीकरण असेच राहणार आहे. यामुळे उपांत्यफेरीत पोहचण्याचा भारताचा मार्ग सोपा झाला आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुपर आठमध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध असणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत टी 20 चे आठ सामने झाले आहेत. त्यातील एक सामना रद्द झाला आहे. उर्वरित सात सामन्यांत भारतानेच विजय मिळवला आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान टी 20 चे 12 सामने झाले आहे, त्यातील केवळ एका सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला आहे तर उर्वरित सर्व सामने भारताने जिंकले आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सतर्क राहवे लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप आणि स्पर्धेत भारताला यापूर्वी पराभूत केले आहे. दोन्ही संघात 31 टी 20 सामने झाले आहेत. त्यातील 19 सामने भारताने जिंकले आहे तर 11 सामन्यात ऑस्ट्रेलिया विजय ठरला आहे. हे सर्व गणित पाहिल्यानंतर सुपर आठ नंतर उपांत्यफेरी गाठवण्याचा भारताचा मार्ग सोपा झाला आहे.
अमेरिकेने क्रिकेट इतिहासात घडवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन संघाने पहिल्यांदाच आयसीसी चषकात भाग घेतला आणि सुपर आठ मध्ये प्रवेश मिळवला आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय खेळ बेसबॉल आहे. परंतु अमेरिकेत आता क्रिकेट रुजू लागले आहे. अमेरिकेने कॅनडाला पराभूत करून विजयाची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला पराभवची चव दाखवली. त्यानंतर भारतालाही विजयासाठी चांगलंच झुंजवले होते. यामुळे अमेरिक संघाचे आता कौतूक होत आहे.