भारतीय क्रिकेट संघाने टी 20 विश्वचषक जिंकला. देशातील क्रिकेटप्रेमी विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा आनंद साजरा करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांना धक्का दिला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ल्ड कपमधील विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे या खेळाडूंच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. आता रोहित शर्मा याने अचानक निवृत्ती का घेतली? त्याबाबत त्यानेच स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्मा याने म्हटले आहे की, “मी निवृत्त होण्याचा विचार केला नव्हता. परंतु परिस्थिती अशी आली की मला निवृत्त होण्याची हिच योग्य वेळ आहे.” आता रोहित शर्मा याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा याचा निवृत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. रोहित शर्मा याचे फॅन आता गौतम गंभीरचा संदर्भ जोडत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा याचा फॅन असलेल्या एका युजरने म्हटले आहे की, रोहित शर्माला गंभीर टारगेट करत होते. त्यामुळे रोहित शर्मा याने स्वत:च निवृत्तीचा विचार केला. परंतु अनेक युजर हा दावा फेटाळला आहे.
Rohit Sharma: "I was not in the mood to retire from T20I, but the situation has arisen, so I decided to do so."🥺
Is he targeting Gambhir? Perhaps he is thinking of building a new team. He might have thought of retiring on his own.
But definitely play IPL ❤
Champions Trophy pic.twitter.com/ljZds2zKbd— Saurabh kumar (@Saurabhk0096) June 30, 2024
एका युजरने लिहिले आहे की, “नॉनसेन्स!” गंभीरचा त्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. रोहित शर्मा याने त्याचा जुना सहकारी विराट निवृत्त झाल्याचे पाहिले आणि त्याला वाटले की चॅम्पियन म्हणून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. T20 मध्ये अजून काही साध्य करायचे नाही, कारण नुकताच विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडिया एका नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे, जो राहुल द्रविडची जागा घेईल. यासाठी गौतम गंभीरने एक मुलाखतही दिली आहे.
VIDEO | Here's what former cricketer Gautam Gambhir said on the retirement of Rohit Sharma and Virat Kohli from T20 format.
"They both are great players and have done so much for Indian cricket. I really want to congratulate and wish them all the best. They still play One Day… pic.twitter.com/0lQAd9J3gd
— Press Trust of India (@PTI_News) June 30, 2024
रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना गौतम गंभीर याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीसंदर्भात शुभेच्छा दिल्या.
– Rohit Sharma retired.
– Virat Kohli retired.
– Ravindra Jadeja retired.Now, the fear of Gautam Gambhir is making these seniors retire from T20 cricket with dignity. Otherwise, we have a habit of dragging it until it ends in humiliation.#IndiaWon #T20WoldCup #INDvsSA pic.twitter.com/mIvtFUrnYw
— Sann (@san_x_m) June 30, 2024
गौतम गंभीर म्हणाला, “मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. ते एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतील. तसेच देश आणि संघाच्या यशात त्यांचे योगदान यापुढेही कायम राहणार आहे. सध्या संपूर्ण देश खूप आनंदी आहे. मी रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो.”
Rohit Sharma: "I was not in the mood to retire from T20I, but the situation has arisen, so I decided to do so."
Is he targeting Gambhir? Perhaps he is thinking of building a new team. He might have thought of retiring on his own. pic.twitter.com/bD47G9UXUV
— Jod Insane (@jod_insane) June 30, 2024