थरार आणि फक्त थरार… T20 सेमीफायनलमध्ये 4 ताकदवान संघ, ‘या’ दिवशी, ‘या’ चार संघांमध्ये काँटे की टक्कर

| Updated on: Jun 25, 2024 | 7:18 PM

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये आपण प्रत्येक संघाच्या सुपर 8 सामन्यांमध्ये चांगलाच थरार बघितला. या सामन्यांमध्ये अनेकांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. कुणी सर्वाधिक धावा केल्या, कुणी सर्वाधिक षटकार ठोकले, कुणी सर्वाधिक विकेट घेतल्या. प्रत्येक संघाचा थरार हा एका वेगळ्या उंचीवर गेलेला बघायला मिळाला. त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींमध्ये सेमीफायनलच्या सामन्यांबाबत चांगलीच उत्सुकता आहे.

थरार आणि फक्त थरार... T20 सेमीफायनलमध्ये 4 ताकदवान संघ, या दिवशी, या चार संघांमध्ये काँटे की टक्कर
T20 सेमीफायनलमध्ये 4 ताकदवान संघ, 'या' दिवशी, 'या' चार संघांमध्ये काँटे की टक्कर
Follow us on

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये आज अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश यांच्यात अतिशय रोमांचक सामना बघायला मिळाला. या सामन्यात शेवटच्या बॉलपर्यंत सस्पेन्स बघायला मिळाला. अखेर अफगाणिस्तानने 8 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात विजय मिळाल्याने अफगाणिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. अफगाणिस्तानसाठी हा खूप भावनिक आणि सूवर्ण क्षण आहे कारण टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय. अफगाणिस्तानच्या विजयानंतर आता सेमीफायनलसाठीचे चार संघ फायनल झाले आहेत. यामध्ये अफगाणिस्तानचादेखील समावेश आहे.

सेमीफायनलमध्ये चार संघ गेले आहेत. ग्रप-1 मधून टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये गेले आहेत. तर ग्रुप-2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे दोन संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आहेत. टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये आपण प्रत्येक संघाच्या सुपर 8 सामन्यांमध्ये चांगलाच थरार बघितला. या सामन्यांमध्ये अनेकांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. कुणी सर्वाधिक धावा केल्या, कुणी सर्वाधिक षटकार ठोकले, कुणी सर्वाधिक विकेट घेतल्या. प्रत्येक संघाचा थरार हा एका वेगळ्या उंचीवर गेलेला बघायला मिळाला. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमधील सामन्यांबाबतची उत्सुकता वाढत गेली. आता क्रिकेट प्रेमींमध्ये सेमीफायनलच्या सामन्यांबाबत उत्सुकता आहे. या सामन्यांमध्ये बाजी मारुन कोण फायनलमध्ये एन्ट्री मारत आणि फायनलमध्ये कोण ट्रॉफीचा मानकरी ठरतो? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

पहिला आणि दुसरा सेमीफायनलचा सामना कधी?

क्रिकेट प्रेमींना आता या सामन्यांसाठी फार वेळ पाहावी लागणार आहे. कारण आजच्या सामन्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजेच येत्या 27 जूनला दोन्ही सेमीफायनलचे सामने बघायला मिळणार आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना हा भारतीय वेळेनुसार पहाटे सहा वाजेपासून बघता येणार आहेत. तर दुसरा सेमीफायनल सामना हा भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता पाहता येणार आहे. दोन्ही सेमीफायनल सामन्यांमध्ये मातब्बर संघ एकमेकांच्याविरोधात असणार आहेत. त्यामुळे या सामन्यांचा थरार बघायला क्रिकेट प्रेमींना फार मजा येणार आहे.

सेमीफायनलमध्ये कोण-कोणाविरोधात भिडणार?

टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपचा पहिला सेमीफायनलचा सामना हा 27 जूनला पहाटे 6 वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात हा पहिला सामना होणार आहे. या सामन्यात जो विजयी होईल तो संघ थेट फायनलमध्ये जाणार आहे. तर दुसऱ्या संघाचा प्रवास तिथेच थांबणार आहे. याच दिवशी रात्री आठ वाजता टीम इंडिया विरुद्ध इग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया गेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील सेमीफायनलचा पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळणार आहे. याआधी टी-ट्वेन्टीच्या 2022 च्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा तब्बल 10 विकेटने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाला त्यावेळी अंतिम सामन्यात जाण्यापासून मुकावं लागलं होतं. आता त्या पराभवाचा बदला घेण्यात टीम इंडियाला यश येतं का? ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही सेमीफायनलमध्ये जे दोन संघ जिंकतील त्यांच्यात येत्या 29 जूनला अंतिम सामना होईल. या सामन्यात जो जिंकेल तो टी-ट्वेन्टी 2024 चा विजयाचा मानकरी ठरेल.