टी-20वर्ल्ड कप सुपर-8 मधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरू आहे. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सावध सुरूवात केली होती. परंतु आजही दोघे लवकर आऊट झाले. विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. विराटने आपल्या 24 धावांच्या खेळीमध्ये नवीन उल हक याला एक कडक सिक्सर मारला. आयपीएल मधील दोघांच्या वादाची आणि त्यासोबतच पाकिस्तानच्या हॅरिस रॉफ याला मारलेल्या षटकाराची सर्वांना आठवण झाली.
Virat Kohli recreated MCG 18.5 at Barbados.
“Kohli goes down the Ground, Kohli goes out of the Ground” 🔥pic.twitter.com/XAQMckbw04
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) June 20, 2024
आजच्या सामन्यात रोहित शर्मा 20 धावा (1 चौकार, 0 षटकार), विराट कोहली 24 धावा (0 चौकार 1 षटकार) आणि रिषभ पंत 20 धावा (4 चौकार) मारत आऊट झाले. रोहित परत एकदा लेफ्ट आर्म बॉलरच्या जाळ्यात अडकला. राशिद खानने पंत आणि कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवलं. टीम इंडिया किती टार्गेट करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.