PHOTO: T20 World Cup च्या इतिहासातील रेकॉर्डवीर, एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश
टी20 विश्वचषकाला अगदी वाजत-गाजत सुरुवात झाली आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक दमदार रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. पण तोवर या स्पर्धेतील आता पर्यंतच्या काही रेकॉर्डवर नजर टाकूया.
1 / 5
टी20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) स्पर्धेला अगदी वाजत-गाजत सुरुवात झाली आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत अनेक दमदार रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. पण तोवर या स्पर्धेतील आता पर्यंतच्या काही रेकॉर्डवर नजर टाकूया...
2 / 5
टी-20 विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि युनिव्हर्सल बॉस नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने या स्पर्धेत 28 विश्वचषकाच्या सामन्यात 60 षटकार ठोकले आहेत.
3 / 5
टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विचार करता हा विक्रम श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्याने 321 सामन्यात 1 हजार 16 धावा केल्या आहेत.
4 / 5
सर्वाधिक टी20 विश्वचषकातील विकेट्स पाकिस्तानचा अष्टपैलू माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावे आहे. आफ्रिदीने 34 सामन्यात 39 बळी टिपले आहेत.
5 / 5
या यादीत असणारे एकमेव भारतीय नाव म्हणजे महेंद्रसिंह धोनी. धोनीने सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे. धोनीने टी20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.