मुंबई : अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफगाण (Asghar Afgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले. कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात तो निवेदकाशी बोलताना तसेच तंबूत गेल्यावरही रडत असल्याचं पाहायला मिळालं. असगरने त्याच्या अखेरच्या सामन्यात 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली. (T20 World Cup: ICC congratulates former Afghanistan captain Asghar Afghan on a fine career as batter and also Captain)
दरम्यान, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत असगरने धोनीला मागे टाकले आहे. धोनीने कर्णधार म्हणून भारतासाठी 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 41 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, असगर अफगाणने 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. म्हणजेच, सर्वाधिक विजय नोंदवणाऱ्या T20I कर्णधारांमध्ये असगर अफगाणचे स्थान पहिले आणि एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे.
असगर अफगाणची क्रिकेट विश्वात सध्या मोठी चर्चा आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या खेळाडूचे अभिनंदन केले आहे आणि त्याला या खेळाचा खरा राजदूत म्हटले आहे. आयसीसीचे कार्यवाहक मुख्य अधिकारी ज्यॉफ अलार्डिसे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “असगर अफगाण हा खेळाचा खरा राजदूत आहे. अफगाणिस्तानला जागतिक क्रिकेटमध्ये मोठं करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. त्याने फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहेच. तसेच संघाचा कर्णधार असताना त्याने शानदार नेतृत्व केले. ICC च्या वतीने मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आगामी काळातही तो या खेळाशी जोडला जाईल अशी आशा आहे.”
असगरने 2009 साली स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. त्याने अफगानिस्तानकडून 6 टेस्ट सामने, 115 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये 44.00 च्या ,सरासरीने 440 रन आणि वनडेमध्ये 24.73 च्या सरासरीने 2 हजार 467 रन केले आहेत. त्याने दोन्ही प्रकारात एक-एक शतकही लगावलं आहे. तर टी20 फॉर्मेटमध्ये 1 हजार 358 धावा त्याने केल्या आहेत. असगरने 59 वनडे आणि 52 टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहिलं. यात 52 पैकी 42 टी20 सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयी झाला.
असगर हा संघासाठी काहीही करु शकत होता, याचं उदाहरण एका किस्स्यातून येतं. असगरने संघाला गरज असताना एका अत्यंत मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही अवघ्या दोन आठवड्यात पुन्हा मैदानावर हजेरी लावली होती. यंदाही विश्वचषकाच्या संघात तो नव्हता. पण क्वॉलिफायर सामन्यात अफगानिस्तान सलग तीन मॅच पराभूत होताच असगरला संघात सामिल करण्यात आलं. त्याची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्याने संघासाठी खेळून संघाला विश्वचषकात क्वॉलीफाय करु दिलं.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं
(T20 World Cup: ICC congratulates former Afghanistan captain Asghar Afghan on a fine career as batter and also Captain)