IND vs SA: Perth मधून हवामानाबद्दल महत्त्वाची बातमी, इथे रंगणार भारत वि दक्षिण आफ्रिका सामना

| Updated on: Oct 30, 2022 | 1:42 PM

IND vs SA: ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने काय अंदाज वर्तवलाय? पाऊस कोसळण्याची शक्यता किती टक्के?

IND vs SA: Perth मधून हवामानाबद्दल महत्त्वाची बातमी, इथे रंगणार भारत वि दक्षिण आफ्रिका सामना
perth
Image Credit source: twitter
Follow us on

पर्थ: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामना होणार आहे. पर्थमध्ये ही मॅच खेळली जाणार आहे. सेमीफायनलमध्ये दाखल होण्याच्या दृष्टीने दोन्ही टीम्ससाठी ही मॅच महत्त्वाची आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी हवामान कसं असेल? हा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप सुरु असताना पाऊसही कोसळतोय. त्यामुळे काही महत्त्वाचे सामने रद्द करावे लागले आहेत.

हवामान विभागाने काय म्हटलय?

आजच्या मॅचआधी हवामान कसं असेल? पाऊस कोसळणार? संपूर्ण 20 ओव्हर्सचा खेळ होणार ? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहेत. फॅन्सच्या मनातील या प्रश्नांवर ऑस्ट्रेलियन हवामान विभागाने उत्तर दिलं आहे.

पाऊस कोसळेल, पण कधी?

ऑस्ट्रेलियन हवामान विभागानुसार, पर्थमध्ये पाऊस कोसळू शकतो. आकाशात काळे ढग असतील. 50 टक्के पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. आता ही बातमी वाचून किंवा एवढ ऐकून क्रिकेट रसिक निराश होतील. पण क्रिकेट रसिकांनी हे जाणून घेणं गरजेच आहे, पर्थमध्ये पाऊस कोसळणार, पण केव्हा? सामन्यादरम्यान पाऊस होणार, की त्यानंतर?

पर्थमध्ये पाऊस होईल, पण….

ऑस्ट्रेलियन हवामान विभागानुसार, आज दुपारच्या वेळी आणि संध्याकाळ होण्याआधी पाऊस कोसळू शकतो. हवामानाचा परिणाम भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापेक्षा पाकिस्तान-नेदरलँडस मॅचवर जास्त दिसेल. ज्यावेळी पावासाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्याचा भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे.


पर्थमध्ये आज सकाळी ऊन

पर्थमध्ये आज दिवसाची सुरुवात ऊनाने झाली. सकाळ-सकाळी तिथे चांगलं ऊन पडलं होतं. आता दुपारी पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियात हवामानाबद्दल अंदाज वर्तवण थोडं कठीण आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याआधी पर्थवर पाकिस्तान-नेदरलँड्समध्ये सामना होईल. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तान आणि नेदरलँड्स दोघांसाठी ही मॅच महत्त्वाची आहे.