T20 World Cup 2022: महामुकाबल्याआधी टीम इंडियासमोर 3 मोठे प्रश्न, वॉर्म अप मॅचमधून उत्तर मिळणार?

| Updated on: Oct 17, 2022 | 10:03 AM

T20 World Cup 2022: टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाला भिडण्यासाठी ब्रिस्बेनच्या मैदानात उतरली आहे

T20 World Cup 2022: महामुकाबल्याआधी टीम इंडियासमोर 3 मोठे प्रश्न, वॉर्म अप मॅचमधून उत्तर मिळणार?
टीम इंडिया
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World cup) 23 ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) महामुकाबला रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया दोन वॉर्म अप मॅच खेळणार आहे. टीम इंडियाचा (Team India) आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना सुरु आहे. ब्रिस्बेनच्या मैदानात टीम इंडिया तयारीचा आढावा घेण्यासाठी उतरली आहे. पाकिस्तान विरुद्ध सुपर 12 फेरीत सामना होणार आहे. त्यआधी टीम मॅनेजमेंट आज तीन प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल.

शमीसाठी ही मॅच महत्त्वाची

जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्याजागी मोहम्मद शमीला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान दिलं. अलीकडेच त्याला कोरोना झाला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वॉर्म अप मॅचमधून मोहम्मद शमीचा फिटनेस लक्षात येईल. शमी मागच्या तीन महिन्यापासून एकही सामना खेळलेला नाही. तो याआधी मागच्यावर्षी 2021 टी 20 वर्ल्ड कपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. वॉर्म अप मॅच शमीसह टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे.

अश्विन आणि चहल कोणाला मिळणार संधी?

रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याजागी अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आलाय. फिरकी गोलंदाजाच्या दुसऱ्या जागेसाठी आर.अश्विन आणि युजवेंद्र चहलचा पर्याय आहे. चहल टी 20 मधला भारताचा यशस्वी फिरकी गोलंदाज आहे. अश्विनला संधी दिल्यास तो उपयुक्त फलंदाजी सुद्धा करु शकतो. कारण अश्विनने अनेकदा आपल्या बॅटिंगच्या बळावर मॅच जिंकून दिली आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात अश्विनने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या होत्या.

हर्षल पटेलकडून अपेक्षा

हर्षल पटेलने आयपीएलच्या मागच्या दोन सीजनमध्ये कमालीचा खेळ दाखवला आहे. मागचे काही महिने तो दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याची जागा निश्चित नव्हती. मागच्या काही सामन्यात हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला आहे. डेथ ओव्हर्समध्ये बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियाला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील.