T20 World Cup 2021 : भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याने भारत यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील लढाई सुरु करत आहे. भारत आणि पाकिस्तान संघांमधील या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने आधीच अंतिम 12 खेळाडू जाहीर केले असताना आता भारतानेही आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले आहेत.
अनेकांनी या सामन्यात भारताने कोणत्या प्लेईंग इलेव्हनसोबत उतरावं याबाबतचे सल्ले दिले होते. त्यानंतर अखेर आता भारताने आपले अंतिम 11 खेळाडू समोर आले आहेत. यावेळी भारताने 5 गोलंदाज घेतले आहेत. ज्यामध्ये दोन फिरकीपटूंसह तीन वेगवान गोलंदाजाना सामिल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिस्ट्री स्पीनर वरुणला संघात संधी देण्यात आली आहे.
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.
स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी दोन देशांचे चाहते दुबईत दाखल होऊ लागले आहेत.
आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचा बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला दाखल झाला आहे, तर भारतातील टीम इंडियाचा मोठा चाहते सुधीर गौतम देखील दुबईला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते
इतर बातम्या
(T20 World Cup, India vs Pakistan : Indias final 11 man squad for the match against Pakistan announced)