दुबई : नामिबियाचा (Namibia) क्रिकेट संघ सध्या आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 (ICC T20 World Cup-2021) स्पर्धेत खेळत आहे. या संघात एक असा खेळाडू आहे जो दुहेरी भूमिका बजावत आहे. तो क्रिकेटही खेळतो आणि नोकरीही करतो. क्रेग विल्यम्स (Craig Williams) असे या खेळाडूचे नाव आहे. (T20 World Cup: Namibian player Craig Williams plays cricket in the day, works for an insurance company at night)
नामिबियाचा सामना रविवारी अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विल्यम्सची नजर आपल्या संघाच्या विजयावर असेल. विल्यम्सने शनिवारी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याचे मुख्य काम काहीतरी वेगळे आहे. तो एका विमा कंपनीत काम करतो. तो दिवसा क्रिकेट खेळतो आणि रात्री विमा कंपनीचं काम करतो.
तो म्हणाला, “मला कोणीतरी चुकीचे सिद्ध करावे असे मला वाटते परंतु मला वाटते की, या विश्वचषकात मी एकमेव व्यक्ती आहे जो रात्री घरी जातो आणि विमा कंपन्यांसाठी विमा अहवाल लिहितो.” नामिबियाकडे केवळ 18 पूर्णवेळ खेळाडू आहेत. तरीदेखील हा संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरला. त्यांनी सुपर-12 मध्ये स्थान मिळवले. सुपर-12 फेरीत त्याने स्कॉटलंडचा पराभव केला. आता खरे आव्हान त्याच्यासमोर असेल कारण त्यांना आता अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांचा सामना करावा लागणार आहे.
2018 मध्ये विल्यम्सने क्रिकेटला रामराम केला होता. त्याला आपल्या कामात लक्ष घालायचे होते. पण प्रशिक्षक पियरे डी ब्रुइनने त्याला पुन्हा क्रिकेटमध्ये आणले. तरीही त्यांच्यासाठी क्रिकेट हा बोनस आहे. तो इनडोअर क्रिकेट सेंटर, क्रिकेट शॉप आणि कनिष्ठ अकादमी चालवतो. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला विल्यम्स म्हणाला, मी व्यवसायासाठी खूप काही करतो. नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणे हा माझ्यासाठी बोनस आहे. मी याला छंद म्हणणार नाही, कारण मला वाटते की आम्ही व्यावसायिक खेळाडू आहोत. पण मला वाटते की मी त्याचा आनंद घेतो. मी यावर 100% अवलंबून नाही इतकेच आहे. मी इतर गोष्टी देखील करतो ज्या मला व्यस्त ठेवतात.”
नामिबियाचा हा पहिलाच विश्वचषक नाही. 2003 मध्ये त्यांचा संघ पहिल्यांदा विश्वचषक खेळला होता. हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. नामिबियाने सहा गट सामने खेळले आणि सर्व सामने गमावले. क्रिकेट नामिबिया 2007 मध्ये ICC च्या हाय परफॉर्मन्स कार्यक्रमाचा भाग बनला. मात्र त्यांना वर्ल्डकपमध्ये प्रवेश मिळत नव्हता. पण या संघाने आपल्या मेहनतीने ICC T20 विश्वचषक-2021 साठी पात्रता मिळवली आणि नंतर पहिल्या फेरीचा अडथळा पार करत सुपर-12 मध्येही पोहोचला.
इतर बातम्या
T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे
(T20 World Cup: Namibian player Craig Williams plays cricket in the day, works for an insurance company at night)