T20 WC, Aus Vs Pak : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये रोमांचक सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडला लोवळवलं आणि फायनलमध्ये जागा पक्की केली. न्यूझीलंडच्या विजयाची चर्चा सुरु असतानाच दुसऱ्या सेमी फायनलबाबतही मोठं वृत्त आहे. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये गुरुवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असतील. वर्ल्ड कपवर डोळा ठेवून असलेल्या पाकिस्तानसाठी मात्र चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण त्यांचे फार्मातले दोन बॅटसमन फ्लूनं आजारी आहेत. हे दोन बॅटसमन आहेत शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान. फ्लूमुळे शोएब आणि रिजवान दोघांनीही प्रॅक्टिसमध्येही भाग घेतला नाही. चांगल्या फार्मात असलेल्या दोन्ही फलंदाज फ्लूनं बेजार झाल्यामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगतं की काय अशी चर्चा आता सुरु झालीय.
पाकिस्तानी माध्यमांनुसार-सरफराज अहमद आणि हैदर अलीला रिप्लेसमेंट म्हणून तयार ठेवण्यात आलंय. दोघेही जण सध्याच्याच स्क्वॉडचाच भाग आहेत. दरम्यान शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान दोघांचीही कोरोना टेस्ट करण्यात आलीय आणि तिचे रिपोर्ट नेगेटीव्ह आहेत. पण डॉक्टरांनी सध्या तरी दोघांनाही आराम करण्याचा सल्ला दिलाय. सेमी फायनलच्या आधीच दोघांबाबतही मोठा निर्णय होऊ शकतो.
मॅच सेमी फायनलचा आहे आणि समोर ऑस्ट्रेलियासारखी मजबूत टीम आहे. त्यांना मात द्यायची असेल तर फार्मात असलेले बॅटसमन खेळणं गरजेचं आहे. शोएब मलिक आणि मोहम्मद रिजवान दोघेही सध्या खोऱ्यानं रन्स काढतायत. शोएब मलिकनं तर शेवटच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 54 रन्स ठोकल्यात. यावरुनच सध्या तो पाकिस्तान टीमसाठी किती महत्वाचा आहे याचा अंदाज येईल.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये शोएब मलिकनं- 26, 19, 54 अशा रन्स केल्यात. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद रिजवान- 79, 33, 08, 79, 15 अशा रन्स केल्यात. त्यात रिजवाननं भारताविरोधात केलेली खेळी कशी विसरता येईल.
#SpiritofCricket – Pakistan team visited Namibia dressing room to congratulate them on their journey in the @T20WorldCup#WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/4PQwfn3PII
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 2, 2021
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची टीम सध्या भलत्याच फार्मात आहे. सुपर – 12 स्टेजमध्ये पाकिस्ताननं भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडला मात दिलीय. विशेष म्हणजे पाकिस्ताननं वर्ल्ड कपमध्ये एकही सामना हरलेला नाही. सेमी फायनलला पोहोचणारी पाकिस्तान ही पहिली टीम ठरलीय. ऑस्ट्रेलियाला धूळ चारली की फायनलचं तिकिट पक्कं असं समजलं जात असतानाच फ्लू नावाचं संकट पाकिस्तानवर घोंगावतंय.
पाकिस्तानच्या तुलनेत ऑस्ट्रेलियानं मात्र एक मॅच गमावलाय. ग्रुप-1 मध्ये 5 पैकी 4 सामने ऑस्ट्रेलियानं जिंकलेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाला टी-20 वर्ल्ड कपचा दावेदार मानलं जात नव्हतं. पण त्यांनी दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला एकही टी -20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही तर पाकिस्तान एकदा विश्वविजेता ठरलेला आहे.
हे ही वाचा :