T20 World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानला चढली घमेंड, जोशमध्ये गमावला होश VIDEO

| Updated on: Nov 07, 2022 | 12:45 PM

T20 World Cup: त्यांना असं वाटत होतं की, ते आमच्यापासून वाचतील पण आम्ही इथेच आहोत" असं मॅथ्यू हेडन म्हणाले.

T20 World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानला चढली घमेंड, जोशमध्ये गमावला होश VIDEO
pakistan Team
Image Credit source: twitter
Follow us on

एडिलेड: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. याचा पुरावा टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये पहायला मिळाला. रविवारी एडिलेडमध्ये असंच घडलं, ज्याची कोणी अपेक्षा केली नव्हती. दक्षिण आफ्रिकेच वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. नेदरलँड्स सारख्या टीमने त्यांना हरवलं. पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल, अशी कोणी अपेक्षा केली नव्हती. पण चमत्कारिकरित्या पाकिस्तानची टीम सेमीफायनलमध्ये दाखल झाली. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तानी टीम जोशमध्ये आली आहे. या टीमचे मेंटॉर मॅथ्यू हेडन यांनी जोशमध्ये होश गमावले.

हेडन हे काय बोलून गेले?

पाकिस्तानी टीम सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर मॅथ्यू हेडन म्हणाले की, “ही टीम आता जास्त खतरनाक बनली आहे. पाकिस्तानशी सामना व्हावा, अशी आता कुठल्याही टीमची इच्छा नसेल” “पाकिस्तान एक धोकादायक संघ आहे. पाकिस्तानी टीम आता खऱ्या अर्थाने धोकादायक बनली आहे. कुठल्याही दुसऱ्याटीमला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानशी खेळण्याची इच्छा नसेल. त्यांना असं वाटत होतं की, ते आमच्यापासून वाचतील पण आम्ही इथेच आहोत” असं मॅथ्यू हेडन म्हणाले.

पाकिस्तानला चढली घमेंड

पाकिस्तानने पहिले दोन सामने हरल्यानंतर चांगला खेळ दाखवलाय यात कुठलीही शंका नाही. नशिबाने साथ दिल्यामुळे ही टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली. पण याचा असा अर्थ होत नाही की, सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या अन्य तीन टीम्सच्या मनात त्यांची दहशत असेल. पाकिस्तानपेक्षा जास्त चांगला खेळ अन्य तीन टीम्सनी दाखवलाय.

अन्य टीम्सचा खेळ कसा आहे?

न्यूझीलंडने सर्वप्रथम टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यांनी इंग्लंडपेक्षा चांगला खेळ दाखवला आहे. टीम इंडियाचा या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत फक्त एक पराभव झालाय. तो सुद्धा दक्षिण आफ्रिकन टीमने अटी-तटीच्या लढतीत पराभव केला. अशावेळी पाकिस्तानी मेंटॉरने अन्य टीम्स त्यांना घाबरतील हे म्हणण्यात काही अर्थ नाही.

सेमीफायनलमध्ये पाकिस्तानची टक्कर न्यूझीलंड बरोबर

पाकिस्तानचा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा सामना बुधवारी सिडनीमध्ये होईल. अलीकडेच पाकिस्तानी टीमने न्यूझीलंडला त्यांच्याच देशात ट्राय सीरीजच्या फायनलमध्ये हरवलं होतं.