दुबई: यंदाचा टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आपल्याला अंतिम सामन्यात खेळणारी एक टीमही मिळाली. सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला मात देत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आहे. चुरशीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. त्यानंतर आता अंतिम सामन्यात जाणारा दुसरा संघ कोणता? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाकिस्तानच्या संघाची कामगिरी या स्पर्धेत सर्वात भारी आहे. सुपर 12 फेरीत 5 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह त्यांनी ही फेरी गाठली आहे. तर दुसरीकडे ग्रुप 1 मधून आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने नेही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे. आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे संघ आमने-सामने भिडणार आहेत. यातील जिंकणारा संघ 14 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळेल.
टी – 20 विश्वचषकातील दुसरा सेमीफायनलचा सामना आज गुरुवारी (11 नोव्हेंबर) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आजचा टी -20 सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे.
या विश्वचषकातील दुसरा सेमीफायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.
या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
पाकिस्तान संघ: मोहम्मद रिजवान, बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, हैदर अली, शाहीन आफ्रीदी
ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.
इतर बातम्या
(T20 world cup Semi final 2 between Pakistan vs Australia live streaming when and where to watch online match)