T-20 विजेता टीम इंडियाच्या स्वागताचे दहा VIDEO: खेळाडूही म्हणाले…थँक्यू इंडिया!

| Updated on: Jul 05, 2024 | 7:59 AM

T20 World Champion Team India Victory Parade Video: सर्वजण जल्लोष करत होते. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू नाचताना आणि गातानाही दिसले. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत लाखो लोक चॅम्पियन्सची झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसले.

T-20 विजेता टीम इंडियाच्या स्वागताचे दहा VIDEO: खेळाडूही म्हणाले...थँक्यू इंडिया!
Follow us on

टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी भारतात दाखल झाली. भारतीय संघाचे दिल्लापासून मुंबईपर्यंत सर्वत्र स्वागत करण्यात आले. भारतीय संघाच्या गौरवासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वानखेडे स्टेडियवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.

त्या ठिकाणी भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक दिला. 16 तासांच्या प्रवासानंतर दिल्ली आणि नंतर मुंबईत आलेल्या भारतीय खेळाडूंचा थकावा क्रिकेट प्रेमींच्या प्रेमामुळे पळला होता.

हे सुद्धा वाचा

 

टीम इंडियाच्या स्वागतासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत वरुणराजाही आला होता. पावसाच्या साथीने क्रिकेटप्रेमी टीम इंडियाच्या स्वागतासाठी विमानतळापासून रस्त्यांपर्यंत आले होते. भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या या प्रेमामुळे भारतीय संघाचे खेळाडू भारावले. त्यांनी थँक्यू इंडिया…म्हणत भारतीय जनतेचे आभार मानले.

दिल्लीत खेळाडू विमानतळावर आल्यानंतर इंडिया-इंडियाच्या जयघोष सुरु होता. खेळाडू एकामागून एक टीम बसमध्ये चढले. ढोलताशे आधीच वाजत होते. बसमधून उतरताच कॅप्टन रोहित आणि सूर्यकुमार यांनी जोरदार भांगडा केला.

कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पंड्या, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फायनलचा खेळाडू विराटने हॉटेलमध्ये ठेवलेला खास केकही कापला. हॉटेलमधून सर्व खेळाडू पंतप्रधानांच्या निवासस्थानी रवाना झाले.

टीम इंडिया पीएमओमध्ये पोहोचली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. खेळाडूंनी त्यांचे अनुभव पंतप्रधान मोदींसोबत शेअर केले. पंतप्रधानांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. यानंतर चॅम्पियन्स मुंबईला रवाना झाले.

 

टीम इंडियाचे मुंबईतही जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर भारतीय क्रिकेट संघाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. विमानातून बाहेर आल्यानंतर त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

टीम इंडिया बसमध्ये चढली आणि विजयाच्या परेडसाठी निघाली, तेव्हा मुंबईने भारताच्या क्रिकेट स्टार्सला पाहण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली होती. प्रत्येक व्यक्ती आनंदात आणि आनंदात बुडालेला होता.

सर्वजण जल्लोष करत होते. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू नाचताना आणि गातानाही दिसले. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत लाखो लोक चॅम्पियन्सची झलक पाहण्यासाठी आतुर झालेले दिसले.

हलका पाऊस असूनही 3 किमी लांबीच्या रस्त्यावर फक्त लोकच दिसत होते. काहींना झाडांवरून तर काहींना गच्चीवरून खेळाडू बघायचे होते. विराट कोहलीने सर्वांचे धन्यवाद मानले. तुमचे जे प्रेम आम्हाला मिळाले ते आम्ही आयुष्यात विसरु शकणार नाही, असे विराटने चाहत्यांना सांगितले.

हार्दिक पंड्या म्हणाला, भव्य स्वागतासाठी भारताचे आभार. त्यावर त्याने लिहिले आहे की आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो! धन्यवाद मुंबई! तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या विश्वविजेतपदामुळे भारतीय चाहते प्रचंड आनंदात होते.