T20 World Cup 2022: वीजा समस्येमुळे टीम इंडियाचे 2 खेळाडू अडकून पडले भारतात

| Updated on: Oct 12, 2022 | 7:26 PM

टीम इंडियाचे 2 खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात पोहोचलेले नाहीत.

T20 World Cup 2022: वीजा समस्येमुळे टीम इंडियाचे 2 खेळाडू अडकून पडले भारतात
team india
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: टीम इंडिया (Team india) सध्या ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World cup) तयारीमध्ये व्यस्त आहे. 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने (IND vs PAK) टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात करणार आहे. याआधी टीम इंडिया सध्या सराव सामने खेळून आपल्या तयारीचा अंदाज घेत आहे.

दोघांची नेट बॉलर म्हणून निवड

टीम इंडियाचे 2 खेळाडू अजूनही ऑस्ट्रेलियात पोहोचलेले नाहीत. वीजा कारणामुळे 2 गोलंदाजांना ऑस्ट्रेलियात पोहोचायला उशिर होतोय. उमरान मलिक आणि कुलदीप सेन या दोन बॉलर्सना टी 20 वर्ल्ड कपसाठी नेट बॉलर म्हणून निवडलं आहे.

उमरान आणि कुलदीप या दोघांचा वीज अजून आलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जाणारं विमान अजून त्यांना पकडता आलेलं नाही. उमरान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरकडून खेळतोय.

उमरानला दिली होती सवलत

उमरान मलिकला बीसीसीआयकडून जम्मू-काश्मीर टीमसाठी खेळण्याची परवानगी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाला तो कधी जाणार? याबद्दल अजून काहीही अपडेट नाहीय. उमरानच नाही, कुलदीपही अजून ऑस्ट्रेलियाला रवाना झालेला नाही. तो ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून राजस्थान विरुद्ध खेळतोय.

आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन

उमरान आयपीएलमधून चर्चेत आला होता. आयपीएमध्ये 157 किमीप्रतितास वेगान गोलंदाजी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि कुलदीप सेन हे तिघे 6 ऑक्टोबरलाच टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होते.

रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होणार

मोहम्मद सिराजची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी निवड करण्यात आली होती. उमरान आणि कुलदीप वीजा कारणामुळे अजून जाऊ शकलेले नाहीत. आता दोघेही रिझर्व्ह खेळाडूंसोबत रवाना होतील, अशी शक्यता आहे.