T20 WC, Ind Vs Pak : पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडेही गेमचेंजर, PAK पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर

| Updated on: Oct 23, 2021 | 3:52 PM

टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे.

T20 WC, Ind Vs Pak : पाकिस्तानची टीम मजबूत, त्यांच्याकडेही गेमचेंजर, PAK पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहलीचं उत्तर
IND vs PAK
Follow us on

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. दोन्ही देशांचे अनेक माजी खेळाडू आणि क्रीडा समीक्षक या सामन्याबद्दल आपापली मतं व्यक्त करत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? टीम कॉम्बिनेशन कसं असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यापैकी काही प्रश्नांची उत्तरं आज भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहेत. त्याने आज पत्रकारांशी संवाद साधला. (T20 WorldCup 2021, Ind Vs Pak: Pakistan team strong, they also have game changer, Virat Kohli’s answer to PAK journalist)

विराट म्हणाला की, आम्ही गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या निमित्ताने टी-20 क्रिकेट खेळत आहोत. आम्ही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी तयार आहोत. टीममधील सर्व खेळाडूंना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये चांगला खेळ करु. विराटला यावेळी त्याच्या कर्णधारपदावरुन काही प्रश्न विचारण्यात आले, यावर तो म्हणाला की, कर्णधारपदाबद्दल मी यापूर्वी अनेकदा बोललो आहे.

दरम्यान, एका पाकिस्तानी पत्रकाराने विराटला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांबाबत विचारले असता विराट म्हणाला की, “आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल. पाकिस्तानची टीम मबबूत आहे. त्यांच्याकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी मॅच पलटू शकतात.”

पाकिस्तानविरोधात पूर्ण क्षमतेने खेळणे आवश्यक

विराट म्हणाला की, पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाला. आयपीएलमध्ये देखील आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीप्रमाणेच आत्ताही खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.

आयपीएलचा फायदा होईल

विराट म्हणाला, टी-20 क्रिकेटमध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट हे खूप महत्वाचं असतं. तीन ते चार चेंडूमध्ये मॅच बदलते. गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये हे चित्र बदलतं. आयपीएलमध्ये आम्ही जे क्रिकेट खेळलो त्याचा आम्हाला फायदा होईल, असं विराट कोहली म्हणाला.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: अवघ्या 43 चेंडूत संपवला सामना, श्रीलंकेची आश्चर्यकारक गोलंदाजी

T20 World Cup 2021 मध्ये गोलंदाजी किंवा फलंदाजीपेक्षाही ‘ही’ गोष्ट अधिक महत्त्वाची, अजिंक्य रहाणेने व्यक्त केलं मत

T20 World Cup 2021: ऐतिहासिक! नामिबीया संघाचा आयर्लंडवर विजय, प्रथमच सुपर 12 मध्ये एन्ट्री

(T20 WorldCup 2021, Ind Vs Pak: Pakistan team strong, they also have game changer, Virat Kohli’s answer to PAK journalist)