17 SIX, 45 फोर, 50 ओव्हरमध्ये 506 रन्स, मोडला इंग्लंडचा महारेकॉर्ड

| Updated on: Nov 21, 2022 | 3:14 PM

भारतातील 'या' प्रसिद्ध टुर्नामेंटमध्ये बनला महारेकॉर्ड

17 SIX, 45 फोर, 50 ओव्हरमध्ये 506 रन्स, मोडला इंग्लंडचा महारेकॉर्ड
Tamilnadu team
Image Credit source: instagram
Follow us on

चेन्नई: विजय हजारे ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये सोमवारी अक्षरक्ष: धावांचा पाऊस पडला. चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सामना झाला. तामिळनाडूच्या टीमने अरुणाचल प्रदेश टीमच्या विरोधात तब्बल 506 धावांचा डोंगर उभारला. कुठल्याही टीमच लिस्ट ए क्रिकेटमधील हे आतापर्यंतच सर्वोत्तम प्रदर्शन आहे. लिस्ट ए टुर्नामेंटमध्ये 500 पेक्षा जास्त धावा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर होता

तामिळनाडूच्या टीमने अरुणाचल विरोधात 506 धावा फटकावून इंग्लंडचा रेकॉर्ड मोडला. नेदरलँड्स विरुद्ध इंग्लंडने 498 धावा केल्या होत्या. पण तो आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंडच्या आधी सरने ग्लूस्टरशायर विरुद्ध 2007 साली 496 धावांचा डोंगर रचला होता. तामिळनाडूच्या टीमने हे सर्व रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

सलग पाच सेंच्युरी

तामिळनाडूचा ओपनर एन. जगदीशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 277 धावांची इनिंग खेळला. जगदीशन वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणारा पहिला फलंदाज बनला आहे. जगदीशनने सलग पाच शतकं फटकावण्याचा विक्रमही आपल्या नावावर केलायय.

416 धावांची पार्टनरशिप

जगदीशनने फक्त डबल सेंच्युरी ठोकली नाही, तर साई सुदर्शनसोबत 416 धावांची पार्टनरशिप करुन वर्ल्ड रेकॉर्ड रचला. लिस्ट ए मध्ये पहिल्यांदाच कुठल्या जोडीने 400 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केलीय. साई सुदर्शनने 154 धावा तडकावल्या. दोन्ही फलंदाजांनी मिळून 17 षटकार आणि 44 चौकार लगावले. वैशिष्ट्य म्हणजे ही जोडी तुटल्यानंतर तामिळनाडूच्या डावात फक्त एक चौकार मारला गेला.