Dinesh Karthik | तामिळनाडूचा मराठी कोच दिनेश कार्तिकच्या नजरेत खुपला का? पराभवानंतर म्हणाला….

| Updated on: Mar 05, 2024 | 12:55 PM

Dinesh Karthik | तामिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमने 378 धावा केल्या. तामिळनाडूची टीम दुसऱ्याडावात 162 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे रणजी ट्रॉफीमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. या पराभवानंतर तामिळनाडूचे कोच निराश झाले.

Dinesh Karthik | तामिळनाडूचा मराठी कोच दिनेश कार्तिकच्या नजरेत खुपला का? पराभवानंतर म्हणाला....
Dinesh Karthik-Sulkshan Kulkarni
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई आणि तामिळनाडूमध्ये रणजी ट्रॉफीची सेमीफायनल मॅच झाली. या मॅचमध्ये मुंबईने तामिळनाडूला एक डाव आणि 70 धावांनी धूळ चारली. या पराभवामुळे तामिळनाडूच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचण्याच स्वप्न भंग पावलं. मुंबईच्या टीमकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे तामिळनाडूच्या टीममधील अंतर्गत मतभेद समोर आलेत. तामिळनाडूचे कोच सुलक्षण कुलकर्णी यांनी कॅप्टन साई किशोरवर मोठा आरोप केलाय. साई किशोरच्या हेकेखोरपणामुळे तामिळनाडूचा पराभव झाला, असा सुलक्षण कुलकर्णी यांचा दावा आहे.

मुंबई विरुद्ध टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करायची हा संपूर्ण टीमचा निर्णय होता. पण साई किशोरने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली. परिणामी तामिळनाडूचा डाव 146 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात मुंबईच्या टीमने 378 धावा केल्या. तामिळनाडूची टीम दुसऱ्याडावात 162 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे रणजी ट्रॉफीमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.

कोचने काय म्हटलं?

या पराभवानंतर तामिळनाडूचे कोच निराश झाले. त्यांनी कॅप्टन साई किशोर विरोधात वक्तव्य केली. “मी नेहमी थेट बोलतो. आम्ही पहिल्यादिवशी सकाळी 9 वाजताच मॅच हरलो होतो. पीच पाहिल्यानंतर मला माहित होतं की, काय करायच आहे. सर्वकाही सेट होतं. टॉस आम्ही जिंकलेलो. मुंबईकर असल्यामुळे मला परिस्थिती माहिती होती. आम्ही गोलंदाजी करायला हवी होती. पण कॅप्टनचा इरादा वेगळाच होता. शेवटी मैदानात कॅप्टनच बॉस असतो. मी फक्त इनपुट देऊ शकतो” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले.


7 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचलेली टीम

तामिळनाडू कोचच्या या वक्तव्यावर दिनेश कार्तिक नाराज झाले. “तामिळनाडूच्या कोचची ही कृती योग्य नाहीय. त्याने कॅप्टनसोबत उभ राहिलं पाहिजे. त्याऐवजी ते कर्णधाराला पराभवासाठी जबाबदार ठरवत आहेत” असं दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर म्हटलं आहे. साई किशोरच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूची टीम 7 वर्षानंतर रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.