Indian Team: टीम इंडियात तीन कमनशिबी खेळाडू आहेत. टीमला मॅच जिंकवून दिल्यानंतरही त्यांचा फायदा झाला नाही. उलट नुकसानच झालं. हे तिन्ही क्रिकेटपटू टीम इंडियातील मोठ्या राजकारणाराचा बळी ठरलेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकल्यानंतरही पुढच्याच सामन्यात त्यांना ड्रॉप करण्यात आलं. टीम इंडियाच्या चक्रावून टाकणाऱ्या या निर्णयावर काही दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवल्यानंतरही या क्रिकेटर्सना का बाहेर केलं? जाणून घेऊया, कोण आहेत ते 3 खेळाडू.
1. कुलदीप यादव
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव टीम इंडियातील सध्याच्या राजकारणाचा बळी ठरलाय. अलीकडेच बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका झाली. कुलदीप यादवने पहिल्या कसोटीत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. कुलदीपने या कसोटीत एकूण 8 विकेट घेतल्या. पहिल्या डावात 40 धावा केल्या. टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध हा कसोटी सामना 188 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला टीम इंडियात स्थान मिळालं नाही. कुलदीपच्या जागी जयदेव उनाडकटचा समावेश करण्यात आला. क्रिकेटच्या तमाम दिग्ग्जांसह फॅन्सनी भारतीय टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
2. अमित मिश्रा
लेग स्पिनर अमित मिश्रा शेवटचा वनडे सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला. 29 ऑक्टोबरला 2016 रोजी विशाखापट्टनम येथे हा सामना झाला. अमित मिश्राने त्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने 6 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 5 विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीचा इकॉनमी रेट 3.00 होता. अमित मिश्राला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पण या सामन्यानंतर अमित मिश्रा पुन्हा वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसला नाही. तो टीम इंडियातील अंतर्गत राजकारणाचा बळी ठरला.
3 भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा घातक स्विंग गोलंदाज आहे. 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत त्याने कमालीच प्रदर्शन केलं. त्या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पण या मॅचनंतर त्याच टेस्ट करिअर जवळपास संपलं. भुवनेश्वर कुमारला त्या सामन्यानंतर पुन्हा कधी टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारकडे दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. गरज पडल्यास बॅटनेही त्याने चांगली कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार वर्ष 2018 मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत त्याने 63 धावा केल्या व 4 विकेट्स काढले.