ढाका : टीम इंडियाला बांगलादेश (BAN vs IND Test Series 2022) विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवून देण्याच चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) सिंहाचा वाटा होता. कुलदीपने या पहिल्या कसोटीत बॉलिंगसह बॅटिंगमध्येही आपल्या जलवा दाखवला. कुलदीपला जवळपास 22 महिन्यांनी कसोटी संघात कमबॅकची संधी मिळाली होती अन् त्याने या संधीचं पूर्णपणे त्याने सोनं केलं. मात्र पुढे त्याच्यासोबत तेच झालं जे याआधी घडत आलं होतं. कुलदीपला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर बसवण्यात आलं. त्यानंतर नेटकऱ्यांकडून कर्णधार केएल राहुल (K L Rahul) , टीम मॅनेजमेंटवर सडकून टीका करण्यात आली. मात्र अखेर केएलने 25 डिसेंबरला दुसरी कसोटी जिंकल्यानंतर कुलदीपला बाहेर का केलं, याबाबत स्पष्टीकरण दिलंय. (team india captain k l rahul gived clearfication for why not give chance to kuldeep yadav in playing 11 against bangaldesh 2nd test)
आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअर नियम सादर करण्यात आला. तसाच नियम जर कसोटी क्रिकेटमध्ये असता, तर मी निश्चितपणे कुलदीपला दुसऱ्या सामन्यात संधी द्यायला मी आनंदी असतो. कुलदीपला बाहेर बसवण्याचा फार अवघड आणि कठीण निर्णय होता. विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे की पहिल्या कसोटीत त्याने टीम इंडियाला जिंकवलं होतं. तो सामनावीर राहिला होता”, असं केएलने नमूद केलं.
KL Rahul backed the team’s decision to not play Kuldeep Yadav in the second Test #BANvIND | #WTC23https://t.co/v5ejsK9ywT
— ICC (@ICC) December 25, 2022
“हा एक कठोर निर्णय होता. मात्र सामना सुरु होण्याआधी सुरुवातीला खेळपट्टी पाहता आम्ही फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचं संतुलन कायम ठेवण्याला महत्त्व दिलं. आम्हाला फास्टर आणि स्पिनर या दोघांना बरोबर संधी द्यायची होती”, असंही केएलने सांगितलं.
“मला कुलदीपला संघातून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नाही. आम्ही तो निर्णय घेतला होता. हा एक योग्य निर्णय होता. आम्ही या पीचवर वनडे खेळण्याच्या आपला अनुभव लक्षात घेत हा निर्णय घेतला”, असं केएलने नमूद केलं.