टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातोच. पण काहीवेळा मैदानातील ठराविक गोष्टींमुळे तो चर्चेत असतो. रोहित शर्माने कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी असच काहीतरी केलं. रोहित शर्मा पॅव्हेलियनमध्ये काहीतरी बोलत होता. त्यावेळी अचानक त्याने कॅमेरामनला शिव्या द्यायला सुरुवात केली. रोहितने असं का केलं? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या. भारताच्या पहिल्या इनिंग दरम्यान रोहित शर्मा आणि ऋषभ पंत पॅव्हेलियनमध्ये बसले होते. रोहित शर्मा विकेटकीपर पंतसोबत काहीतरी बोलत होता. हेड कोच गौतम गंभीर शेजारी बसले होते.
रोहित शर्मा पंतसोबत बोलत होता. त्याचवेळी त्याला समजलं की, कॅमेरामनने कॅमेरा त्याच्यावर फोकस केला आहे. त्यावेळी रोहितने पंतबरोबर बोलण बंद करुन कॅमेरामनला मॅच दाखवण्याचा इशारा केला. रोहित शर्मा यावेळी मैदानावर जे बोलते, तसे काही शब्द बडबडला. रोहितला असं करताना पाहून पंतला हसायला आलं, गौतम गंभीरही स्वत:वर कंट्रोल करु शकला नाही.
भारतीय गोलंदाजांची कमाल
रोहित शर्मा अनेकदा मैदानावर अपशब्द उच्चारतो. तो आपल्या खेळाडूंना शिव्या देतो. मी हे सर्व मनापासून बोलत नाही, असं तो अनेकदा बोललाय. मैदानाबाहेर गेल्यावर तो हे सर्व विसरुन जातो. कानपूर कसोटीत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. मात्र, तरीही टीम इंडिया विजयाच्या जवळ आहे. टीम इंडियाने पहिला डाव 285 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. बांग्लादेशच्या टीमला 146 रन्सवर ऑलआऊट केलं. कानपूर कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता 95 धावांची आवश्यकता आहे.