लंडन : IPL 2023 चा सीजन संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा इंग्लंडमध्ये दाखल झालाय. मागच्या आठवड्यात शुक्रवारी क्वालिफायर-2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. त्यानंतर रोहितने इंग्लंडची वाट पकडली. रोहितने आता इंग्लंडमध्ये सराव सुरु केलाय. तिथल्या नेट्समध्ये रोहितची बॅट तळपतेय. याचा व्हिडिओ समोर आलाय.
इंग्लंडच्या हवामानात गारवा असल्याने अंगावर जाडजूड कपडे घालून रोहित सराव करतोय. नेट्समध्ये रोहित शर्माच्या शॉट्समध्ये ती ऊर्जा दिसतेय.
रोहितने टि्वटमधून काय सांगितलय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये दाखल होताच रोहिने सराव सुरु केलाय. टीममध्ये दाखल होताच, त्याने एक टि्वट करुन WTC फायनलसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची वेळ जवळ आलीय हे रोहितने त्याच्या टि्वटमधून सांगितलं.
बॅटिंगपाहून खूप अपेक्षा वाढल्या
टि्वटनंतर रोहित शर्मा लगेच ग्लोव्हज आणि पॅड बांधून मैदानात उतरला. नेट्समध्ये त्याने त्याच्या भात्यातील फटके दाखवले. रोहितची नेट्समधील बॅटिंगपाहून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, डिफेन्स आणि फॉरवर्ड डिफेन्स असं सुंदर बॅटिंग कौशल्य रोहितने दाखवलं.
WTC o’clock ?? pic.twitter.com/NxWfq72eWP
— Rohit Sharma (@ImRo45) May 30, 2023
WTC फायनलमध्ये रोहित तसा खेळेल का?
अशी प्रॅक्टिस पाहून समोरची प्रतिस्पर्धी टीम, भले मग ऑस्ट्रेलिया असली, तरी टेन्शनमध्ये येईल. टीम इंडिया T20 मोडमधून टेस्ट मोडमध्ये कशी जाणार? या अनेकांच्या मनात असलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न रोहितने केला. नेट्समध्ये रोहित जितका दमदार वाटतो, तितकी तो WTC फायनलमध्ये बॅटिंग करेल का? हा प्रश्न सुद्धा तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. कारण आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये रोहित शर्माला विशेष प्रभावी कामगिरी करता आलेली नाही.
Latest video of Captain Rohit Sharma’s nets session.
Hitman is getting ready for WTC Final. pic.twitter.com/IzMM7HfU3f
— Vishal. (@SPORTYVISHAL) May 30, 2023
कधीपासून सुरु होणार WTC 2023 फायनल?
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 7 ते 11 जून दरम्यान खेळली जाणार आहे. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही दुसरी फायनल आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा ही फायनल मॅच खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही पहिली फायनल आहे.